महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाऊन?आज टास्क फोर्सच्या महत्वाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती तिला सुरूवात झाली आहे. त्यानंतर त्यांनी अगदी मोजक्याच शब्दात त्यांची भुमिका मांडली. राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. संपुर्ण लॉकडाऊनची वेळ आली आहे. निर्णय घेण्याशिवाय आता पर्याय नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
ज्यामुळे आता लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा बैठक सुरू झाली तेव्हा मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचे सादरीकरण केले. त्यांनी संसर्गाचा धोका, राज्यातील रूग्ण, मृतांचा आकडा, औषधांचा उपलब्ध आकडा याची सर्व माहिती दिली.
त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली भुमिका स्पष्ट केली आणि सांगितले आता लॉकडाऊन हा एकच पर्याय उरला आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ही रूग्ण संख्या नियंत्रणात आणावी लागेल. जर कोरोनाची रूग्णसंख्या नियंत्रणात आणायची असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागेल.
त्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्याय आहे. तसेच लोकांचं येणं जाणं थांबवावे लागेल आणि आपल्याला कार्यालयाच्या वेळा बदलाव्या लागतील. घरातूनच कामाचे नियोजन झाले पाहिजे. पीक अवर ही संकल्पनाही बदलता आली पाहिजे. लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास तो एकमताने झाला पाहिजे.
लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. आजची बैठक फडणवीसांसाठी नाहीतर कालच निर्णय घेतला असता. आपल्याला थोडी कळ सोसावीच लागेल. लॉकडाऊन करावाच लागेल. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य नाही.
विरोधी पक्षांसमोर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने आता लॉकडाऊन होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी सर्व पक्षांना असे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेते याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0 Comments: