निकृष्ट दर्जाचा मका पुरवला; संतप्त नागरिकांचं अनोखं आंदोलन

April 01, 2021 0 Comments

रवी राऊत यवतमाळः गरिबांच्या कुटुंबाला पोषणासाठी शासनाच्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ गेल्या कित्येक वर्षापासून सुरळीत सुरू होता. मात्र शासन आणि प्रशासनाच्या संगनमताने स्वस्त धान्य दुकानात गव्हाच्या जागेवर निकृष्ट दर्जाचा देऊन गरिबांची थट्टा केली जात आहे. प्रशासनाने गरिबाच्या तोंडातून घास काढल्याने सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी प्रशासना विरोधात एल्गार पुकारला आहे. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीत मका हे धान्य रोजच्या जेवणातील नाही, अशा वेळेस यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे स्वस्त राशन दुकानाच्या मार्फत गव्हाच्या ठिकाणी मका पुरवला जात आहे. अंत्योदय गटातील लोकांना प्रती कुटुंबामागे १५ किलो गहू आणि २० किलो तांदूळ दिले जातात. मात्र यावेळी कडधान्याच्या रूपाने गहू ऐवजी निकृष्ट दर्जाचा मका देण्यात आला. ज्यामध्ये कचरा, सोंडे, भरडलेला, काळपट जो जनावरेही खाणार नाही, असा मका प्रती कुटुंब १० किलो देण्यात आला. तसेच प्राधान्य गटातील कुटुंबांनाही अशाच प्रकारे मका देण्यात आला. शासनाच्या पुरवठा विभागाचे काम प्रामुख्याने भेसळ व निकृष्ट दर्जाच्या वस्तूंवर कारवाई करणे आणि योग्य दर्जेदार धान्य, वस्तु उपलब्ध करून देणे आहे. मात्र इथे तर चक्क पुरवठा विभागाकडूनच जनतेला निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य पुरवठा केला जात आहे. अशा प्रकरणात शासनाने निलंबनाची कारवाई केली पाहिजे, अशी मागणी महेश पवार यांनी केली आहे. आजही सरकारी गोदामांमध्ये लाखो क्विंटल गहू सडत असून, तो गरिबांपर्यंत पोहोचत नाही. मग एवढा गहू असताना मका देण्याची गरज काय? जनतेला निकृष्ट मका पुरविण्यासाठी आग्रही असलेल्या दोषींचा शोध घेऊन शासनाने अशा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करावी आणि गरिबांना मका ऐवजी गहू पुढील महिन्यापासून देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. टाळेबंदीच्या काळात गरिबांच्या हाताला काम नाही तेव्हा त्यांचे आयुष्य हे स्वस्त राशन दुकानामार्फत मिळणाऱ्या धान्यावर आहे. मात्र प्रशासन अशा प्रकारचा व्यवहार करीत असेल तेव्हा रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आमच्याकडे नसल्याचे पवार यांनी नमूद केले आहे. घाटंजी येथे झालेल्या या आंदोलनात महेश पवार, सुधाकर दीडशे, विष्णू शिंदे, अशोक नांदेकर यांच्यासह शिधापत्रिकाधारक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या महिलांनी मुखवटे घालून पुरवठा विभागाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवून या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी आंदोलना दरम्यान केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: