जगनमोहन रेड्डींची मोठी घोषणा, महाराष्ट्राला देणार ३०० व्हेंटिलेटर, गडकरींनी मानले आभार
राज्यात कोरोनाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. सध्या व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड्स देखील उपलब्ध होत नाहीत. यामुळे अनेकांचे जीव देखील जात आहेत. अशातच आता आंध्र प्रदेश आपल्या मदतीला धावून आला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस जगनमोहन रेड्डी यांच्याकडे व्हेंटिलेटर्सची मागणी केली होती. नागपूरसाठी मुख्यमंत्री रेड्डी यांनी तब्बल ३०० व्हेंटिलेटर पाठवल्याबद्दल गडकरींनी त्यांचे आभार मानले आहेत.
व्हेंटिलेटर वेळेवर पाठवल्याबद्दल गडकरींनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले. राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. राज्यात मोठी भीषण परिस्थिती असताना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा आहे.
यामुळे आता दिलासा मिळाला आहे.
विशाखापट्टणममध्ये या व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश सरकारने सर्व कोविड रुग्णालयांना कोविड रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. आंध्र प्रदेशात सुरुवातीपासूनच लसीकरणावर भर दिला गेला.
इतर सर्व राज्यांनी लसीकरणावर लक्ष केंद्रीत करने फायद्याचे ठरणार आहे. लसीकरणाची आकडेवारी सरकारने जाहीर केली असता यामध्ये कोरोना बाधा होण्याचे प्रमाण फारच कमी आहे, यामुळे लसीकरण महत्त्वाचे आहे.
ताज्या बातम्या
बारामतीच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनावर प्रभावी औषध, आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
राज्यात अत्यावश्यक प्रवासासाठी आता लागणार ई-पास; असा काढा ई-पास
घाबरू नका! वय ८८, एचआरसीटी स्कोअर २५, मधुमेहाचा आजार; तरीही सहज बरे झाले आजोबा
0 Comments: