राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप

April 01, 2021 0 Comments

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा यांनी केला आहे. विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन तृप्ती देसाई यांनी विटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'विटेकर हे पीडित महिलेवर वर्षभरापासून अत्याचार करत होते. त्यांनी पीडितेचे अश्लील व्हिडीओ देखील तयार केले आहेत. त्या संदर्भात तक्रार करूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. केवळ तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातं, असं देसाई यांनी सांगितलं. शरद पवारांचं नाव घेऊन विटेकर यांनी पीडितेला धमकावल्याचा गंभीर आरोप देखील देसाई यांनी केला. विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. वाचा: विटेकर यांनी हे आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. 'माझ्यावरील बलात्काराचे आरोप साफ खोटे आहेत. केवळ ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने आणि माझी राजकीय जीवनातून संपवण्यासाठी हा प्रयत्न आहे,' असं विटेकर यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना सांगितलं. 'माझ्याकडं या संदर्भात अनेक पुरावे आहेत. आपल्याला विनाकारण या प्रकरणात गोवले जात आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे. विटेकर यांनी या प्रकरणी गंगाखेड न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोणत्याही पद्धतीने माझ्यावर कोणी आरोप करू शकत नाही, असं ते म्हणाले. वाचा: याआधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहबूब शेख यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते. या दोघांनीही ते आरोप फेटाळले होते. मुंडे यांच्याविरोधातील तक्रार नंतर मागे घेण्यात आली होती. कोण आहेत राजेश विटेकर? ३९ वर्षीय राजेश विटेकर हे परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणूनही ते काम पाहत आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, शिवसेनेचे संजय (बंडू) जाधव यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, विटेकर यांनी जाधव यांना कडवी लढत दिली होती. तब्बल ४ लाख ९६ हजार ७४२ मतं मिळवून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. विटेकर यांच्या मातोश्री सध्या परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: