Ahmednagar : पोलीस ठाण्यातच हल्लेखोराने केले ब्लेडने सपासप वार

April 03, 2021 0 Comments

म.टा. प्रतिनिधी, नगर: एकमेकांविरोधात वारंवार तक्रार करणाऱ्या दोघांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिसांनी बोलावले खरे, मात्र वाद मिटण्याऐवजी अधिकच गंभीर झाला. एका आरोपीने पोलिसांसमोरच दुसऱ्यावर ब्लेडने वार केले. त्यामुळे ठाणे अंमलदार कक्षातच एक जण रक्तबंबाळ झाला. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले, तर जखमीला उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. नगर शहरातील ठाण्यात ही घटना घडली. आरोपी राजू मुरलीधर काळोखे याने साहेबराव काते यांच्यावर केला. काते जखमी झाले असून पोलिसांनी काळोखे याला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळोखे व काते यांच्यात पैशांवरून वाद आहेत. शुक्रवारी दुपारी काळोखे आणि काते यांच्यात वाद झाले होते. त्यावेळी हा वाद पोलीस ठाण्यात आला. पोलिसांनी दोघांच्याही तक्रारी घेऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल केले. मात्र, प्रकरण मिटण्याची चिन्हे नव्हती. त्यामुळे शनिवारी तोफखाना पोलिसांनी या दोघांनाही प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. तेथे दोघेही समोरासमोर आल्यावर वाद पुन्हा चिघळला. पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षात यासंबंधीचे कामकाज सुरू होते. बाचाबाची आणि दमबाजी वाढत जाऊन काळोखे याने सोबत आणलल्या ब्लेडने काते याच्यावर वार केले. यामध्ये काते जखमी झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करेपर्यंत आरोपीने सपासप वार केले. शेवटी पोलिसांनी हल्लेखोर काळोखे याला पकडले. प्रतिबंधात्मक कारवाईचे कामकाज सुरू असताना, पोलीस कागदपत्रे तयार करण्यात व्यस्त असताना अचानक ही घटना घडली. त्यामुळे काही काळ पोलिस ठाण्यात धावपळ उडाली होती. तोफखाना पोलिसांनी या प्रकरणी कोळोखे याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. त्याला ताब्यात घेण्यात आले. तर जखमी काते याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या दोघांमध्ये पैशाचा व्यवहार झालेला होता. पैसे वसुलीवरून वाद सुरू होता. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. मात्र आतापर्यंत अदखलपात्र गुन्हे घडलेले असल्याने पोलिसांनी फारसे गांभीर्याने न घेता दोघांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची तयारी केली होती. ते कामकाज सुरू असतानाच हा गंभीर गुन्हा घडला.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: