दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: अखेर श्रीनिवास रेड्डी निलंबित?

March 30, 2021 0 Comments

अमरावती, म. टा वृत्तसेवा : मेळघाटातील वनरक्षक आत्महत्या प्रकरणी अमरावती येथून बदली करण्यात आलेले अपर मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना निलंबित करण्यात आल्याची चर्चा आहे. गुगामल वन्यजीव परिक्षेत्राच्या वनरक्षक दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी मेळघाटच्या हरिसाल येथे स्वतःच्या पिस्तुलने गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी उपवन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली होती. तर, आता रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आरएफओ दीपाली चव्हाण यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी दीपाली चव्हाण यांनी सुसाई़ड नोट लिहिली होती. त्या नोटमध्ये त्यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना उद्देशुन लिहली होती. त्यामुळं श्रीनिवास रेड्डी यांचंही निलंबन करावं अशी मागणी होत होती. भाजपनंही रेड्डींच्या निलंबनांची मागणी उचलून धरली होती. आज, मंगळवारी अपर मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात भाजपने ठिय्या आंदोलन केले. रेड्डी यांच्या निलंबन व अटकेची मागणी करण्यात आली. यादरम्यान अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी रेड्डीच्या अटकेसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आज दुपारी श्रीनिवास रेड्डी यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांनी लिहलेल्या पत्रांची सध्या चर्चा होत आहे. दीपाली यांनी त्यांच्या पतीसाठी लिहलेलं एक भावनिक पत्र समोर आलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: