मेडिकल कॉलेजवरून मुख्यमंत्र्यांचा राणे यांना टोला, म्हणाले...

March 07, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'आपण सत्ताधारी आहोत. आपल्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्यासोबत आहे. आपली सत्ता असूनही तुम्ही काहीही मागणी करीत नाही. तुम्ही रत्नागिरीसाठी सरकारी वैद्यकीय कॉलेज मागितले. तुम्ही स्वत:साठी काही मागितले असते. पण तुम्ही ते केले नाही. काही लोक असतात, इकडे तिकडे काही करून स्वत:साठी काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी सरकारी कॉलेज मागितले. याचा मला अभिमान वाटतो. तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही स्वत:साठी काही मागितले नाही,' असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपचे खासदार यांचे नाव न घेता लगावला. 'शेती ही शाश्वत असून करोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी केवळ दोन घास दिले नाहीत, तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. राज्य सरकारने सुरू केलेल्या 'विकेल ते पिकेल' या योजनेच्या माध्यमातून कोकणवासीयांनी सुजलाम सुफलाम करावा,' असे आवाहन मुख्यमंत्री यांनी शनिवारी केले. मालवण तालुक्यातील मसुरे-आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजना, मालोंड-मालडी कोल्हापुरी पाटबंधारे योजना आणि कणकवली तालुक्यातील कुंभवडे लघु पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. त्या वेळी ते बोलत होते. 'करोनाने जगाची आर्थिक गाडी घसरली. पण, या संकटकाळात अर्थचक्राचा डोलारा सांभाळण्याचे काम शेतकऱ्यांनी केल्याचे सांगून, एक जिल्हा एक उत्पादन आणि त्याला बाजारपेठ मिळावी, मालाचा दर्जा चांगला राहावा, त्याची अधिकाधिक निर्यात व्हावी, यासाठी सरकारने 'विकेल ते पिकेल' योजना सुरू केली आहे. संपूर्ण कोकणपट्टा सुंदर आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. माझे कोकणावरचे प्रेम मी कधीच लपवले नाही. म्हणूनच मी गेल्या वर्षी भराडीदेवीच्या दर्शनाला आलो होतो. त्यामुळे कोकणचा विकास मार्गी लावणार म्हणजे लावणारच. कोकणासाठी जे करता येईल ते करण्याचे वचन भराडीदेवीच्या साक्षीने देतो,' असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. भराडीमातेला वंदन करून करोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. राज्यात अनेक धरण, पाटबंधारे झाले, पण अजून काही कामे बाकी आहेत. आता आपण गोसीखुर्द धरणाच्या कामाला गती दिली आहे. आज या तीन पाटबंधारे कामांचे आपण भूमिपूजन ऑनलाइन करतो आहोत. पण, धरणाच्या उद्घाटनाला मी तिथे प्रत्यक्ष येईन हे माझे तुम्हाला वचन आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: