जळगाव: फुटीर नगरसेवकांविरोधात भाजपची ३० हजार पानी याचिका

March 31, 2021 0 Comments

जळगाव: महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुटून शिवसेनेच्या गोटात गेलेल्या भाजपच्या २७ नगरसेवकांवर पक्षादेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत अपात्र ठरवावे यासाठी बुधवारी नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे भाजपचे गटनेते यांनी तब्बल ३० हजार पानांची याचिका दाखल केली आहे. यावेळी नाशिक महापालिकेचे गटनेते जगदीश पाटील व अॅड. संदीप भगत आदी उपस्थित होते. पक्षांतर बंदीच्या कायद्यान्वये अपात्रतेसाठी दाखल करण्यात आलेली ३० हजार पानांची याचिका ही एकमेव असल्याचा दावा करण्यात येत आहे. महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान सत्ताधारी भाजपमध्ये फूट पडली होती. भाजपच्या २७ नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप न जुमानता शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे भाजपचे महापौर पदाचे उमेदवार प्रतिभा कापसे व उपमहापौर पदाचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा पराभव झाला होता. महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन व उपमहापौरपदी भाजपाचे बंडखोर कुलभूषण पाटील हे विजयी झाले होते. भाजपच्या २७ नगरसेवकांनी पक्षादेश न जुमानता पक्षाशी गद्दारी केल्याने त्यांचे नगरसेवक पद करण्यात यावे याकरता मनपा गटनेता भगत बालानी यांनी आज बुधवारी दुपारी १ वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे याचिका दाखल केली. वाचा: भाजपमधून फुटलेल्या या २७ नगरसेवकांना भाजपने प्रत्यक्ष, मोबाईल, व्हॉट्सअॅप, वृत्तपत्र अशा वेगवेगळ्या माध्यमातून सहा प्रकारे पक्षादेश बजावला होता. मात्र, त्याचे उल्लंघन केल्याचा भाजपचा आरोप आहे. विशेष म्हणजे भाजपने महासभेचे इतिवृत्त, सीडी, महत्वाची कागदपत्रे, व्हीप बजावल्याचे पुरावे असे सर्व एकूण तब्बल ३० हजार पाने असलेली याचिका दाखल केली असल्याची माहिती भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी 'मटा'शी बोलतांना दिली आहे. वाचा: दरम्यान, महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीदरम्यान ऑनलाइन महासभेत नगरसेवक व मनपाच्या अधिकाऱ्यांनी व्यतिरिक्त इतर जण सहभागी झाल्यामुळे ही महासभा बेकायदेशीर असल्याबाबत देखील भाजपकडून न्यायालयात स्वंत्रत याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही भगत बालाणी यांनी दिली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: