अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी आमदारांना केले खूश

March 11, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या महसूलाला गळती लागल्याच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या पगारात ३० टक्के कपात करण्यात आली होती. मात्र आता आमदारांचे वेतन पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थमंत्री यांनी बुधवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी इतर काही घोषणा करताना, त्यात आमदारांचे वेतन १ मार्चपासून पूर्ववत करण्याचीही घोषणा केली. त्याशिवाय आमदारांचा निधीही तीन कोटींवरून चार कोटी करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. करोनामुळे राज्यासह देशाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. लॉकडाउनमुळे सर्व आर्थिक व्यवहार थांबले होते. शिवाय राज्य सरकारला करातून मिळणारे उत्पन्नही थांबले होते. केंद्र सरकारने खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात केली होती. याशिवाय खासदार फंडही दोन वर्षांसाठी स्थगित केला होता. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील आमदारांच्या पगारातही ३० टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ अशी संपूर्ण एक वर्षासाठी ही कपात लागू करण्यात आली होती. वाचा: प्रत्येक राज्यातील वेगवेगळा असतो. महाराष्ट्रात आमदारांचा पगार दरमहा दोन लाख ३२ हजार रु. एवढा पगार आहे. यातून व्यवसाय कर आणि आयकर कापून घेतला जातो आणि उर्वरित रक्कम आमदारांना मिळते. प्रत्येक आमदारांचे उत्पन्न वेगवेगळे असल्याने आयकराची रक्कमही वेगवेगळी असते. आमदारांच्या पगारात कपात केल्यानंतर सर्वसाधारण त्यांना महिन्याला एक लाख ६२ हजार रुपये वेतन मिळत होते. आता ही कपात रद्द करीत वेतन पूर्ववत करण्यात येणार आहे. दुसरीकडे, आमदारांचा स्थानिक विकास निधी तीन कोटी रुपयांवरून चार कोटी रुपये करण्याची घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. गेल्या अधिवेशनात आमदारांचा निधी दोन कोटींवरून तीन कोटी करण्यात आला होता. या निधीत आणखी एक कोटीची वाढ करून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पवार यांनी आमदारांना खुश केले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: