करोनाच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय
अहमदनगर: जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढीमुळे येथील शनिमंदिर शुक्रवारी व शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर अमावस्या यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर व कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी दिली. शिंगणापूर येथे शनी अमावस्याला देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. सध्या करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शनिअमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता शनी मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. शनिवारी देखील दिवसभर दर्शन बंद राहिल. रविवारी (१४ मार्च) दर्शन व्यवस्था पुन्हा पूर्ववत सुरू होईल. वाचा: नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी शनिवारी जमावबंदी लागू केली आहे. ग्रामस्थांनी व भाविकांनी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन सहायक निरीक्षक सचिन बागुल यांनी केले आहे. वाचा:
from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
0 Comments: