राष्ट्रवादीच्या आमदारावर अण्णा हजारे खूश! म्हणाले...

March 11, 2021 0 Comments

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी फारसे पटत नसले तरी स्थानिक आमदारांच्या कामावर मात्र हजारे खूश आहेत. पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांचे हजारे यांनी तोंडभरून कौतुक केले. एवढचे नव्हे तर ‘लंके यांच्या जीवनकार्यावर कोणी पुस्तक लिहिणार असेल, तर त्याचा सर्व खर्च आपण करू,’ असेही हजारे म्हणाले. ( Praises ) वाचा: आमदार लंके यांच्या वाढदिवसानिमित्त हजारे यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी एकाने लंके यांना भेट देण्यासाठी पुस्तक आणले होते. ते हजारे यांच्या हस्ते लंके यांना देण्यात आले. हा धागा पकडून हजारे यांनी लंके यांच्या जीवनकार्यावर अधारित पुस्तकाचा विषय काढला हजारे म्हणाले, ‘आमदार लंके यांचे काम, विचार, त्यांचा सामाजिक व राजकीय दृष्टीकोन हा महत्वाचा आहे. त्यांच्या पक्षातील आमदारांच्या पाठीमागे आपण लागतो, मात्र, लंके यांच्या पाठिशी मी आहे. त्यांना अनेक वर्षांपासून मी जवळून पाहतो. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन त्यांनी सांभाळले आहे. समाजसेवेसाठी तहान-भूक विसरून वाहून घेतले आहे. स्वतःच्या जीवनाचा त्याग केला असून समाजसेवेसाठी झपाटून काम करीत आहेत. त्यांच्या या जीवनकार्यावर पुस्तक झाले पाहिजे. त्यांच्यावर असे पुस्तक लिहिण्यासाठी कोणी पुढे येणार असेल तर स्वागतच आहे. यासाठी लागणारा सर्व खर्च मी स्वत: करीन. तालुक्याला असा आमदार पूर्वीच मिळायला हवा होता. लंके यांच्याप्रमाणे राज्यातील इतर आमदारांनीही कामे केले पाहिजे,’ असेही हजारे म्हणाले. वाचा: यावेळी माजी सरपंच जयसिंग मापारी, बाबाजी तरटे, सुरेश पठारे, दादासाहेब पठारे, माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, योगेश मापारी, संभाजी वाळूंज उपस्थित होते. शिवसनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले लंके प्रथमच पारनेरचे आमदार झाले आहेत. तेव्हापासून त्यांचा हजारे यांच्याशी चांगला संपर्क आहे. मुख्य म्हणजे या आधी सलग तीन वेळा पारनेरचे आमदार असलेला विजय औटी यांच्याशीही हजारे यांचे चांगले संबंध होते. एका निवडणुकीत तर हजारे यांना औटी यांना पाठिंब्याच पत्र दिले होते. पक्ष न पाहता केवळ उमेदवाराचे चारित्र्य व काम पाहून औटी यांना पाठिंबा दिल्याचे त्यावेळी हजारे यांच्याकडून सांगण्यात आले होते. नंतरच्या निवडणुकीत औटी यांचाच पराभव करून लंके विजयी झाले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: