हॉलवर छापे पडतात म्हणून लग्नघरच्या मंडळींनी लढवली 'ही' शक्कल

March 05, 2021 0 Comments

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई विषाणू पुन्हा डोके वर काढू लागल्याने लग्नसमारंभातील संख्येवर निर्बंध लादण्यात आले असून महापालिकेची पथके मंगल कार्यालयांवर छापे टाकतात. हे टाळण्यासाठी लग्नापेक्षा 'हळदी' समारंभात अधिक डामडौल केला जात आहे. इमारतींच्या गच्ची, सोसायट्यांच्या आवारात, चाळींच्या पटांगणात डीजे, बेन्जोच्या तालावर 'हळदी'चा रंग चढत आहे. हळदीचे निमित्त करून मित्रमंडळी, शेजारी यांना घरीच मेजवानी दिली जात आहे. करोना पसरविण्यासाठी केवळ मंगल कार्यालयातीलच नव्हे, तर घरचीही गर्दी कारणीभूत ठरू शकते याचा विसर लोकांना पडला आहे. वाचा: ... नियंत्रणात आलेला करोना पुन्हा वाढू लागल्याने लग्न समारंभासाठी दोन्ही बाजूच्या प्रत्येकी ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे. इतक्या कमी लोकांमध्ये मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी यांना बसवता येत नसल्याने वेगवेगळ्या कल्पना लढविण्यात येत आहेत. मंगल कार्यालयांमध्ये गर्दी केल्यास पालिकेच्या वतीने गुन्हे दाखल केले जात असल्याने केवळ धार्मिक विधीसाठी ठेवण्यात आला आहे. मुंबईतील इमारती, सोसायटी, चाळींमध्ये रोषणाई केली जात आहे. वरातींना बंदी असल्याने डीजे किंवा बेन्जो लावून नाचण्याची हौस पूर्ण केली जात आहे. जेवणाचे वेगवेगळे मेन्यू ठेवून अगदी मंगल कार्यालयांप्रमाणेच कॅटरर्स ठरवून पक्वान्नाची मांडणी केली जात आहे. मुंबईत ठिकठिकाणी हे चित्र दिसत आहे. मात्र हे सर्व करताना करोनाच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येते. हा धोका आहेच लग्नाला गर्दी करण्यावर निर्बंध असल्याने हळदी समारंभांना गर्दी केली जात आहे. या गर्दीच्या संपर्कात वधू, वर तसेच घरातील मंडळी येतात. गर्दीमधील कुणापासून संसर्ग झाल्यास त्याचा फटका मंगल कार्यालयांमध्ये उपस्थित राहणाऱ्यांना बसण्याचा धोका आहे. त्यामुळे गर्दी टाळणे आवश्यक आहे. अशीही शक्कल गर्दी टाळण्यासाठी आणखी एक शक्कल लढविण्यात येत आहे, ती म्हणजे निमंत्रितांचे विभाजन. , लग्न आणि स्वागत समारंभ अशा तीन प्रकारे लग्नपत्रिका छापल्या जात आहेत. हळदीला उपस्थित राहिलेले पुन्हा लग्न किंवा स्वागत समारंभाला जाणे टाळतात. राजकीय मंडळींबरोबरच आता सर्वसामान्य नागरिकही हाच फंडा वापरात आणत आहेत. वाचा: वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: