एकनाथ निमगडे हत्या प्रकरण; फडणवीसांच्या घरासमोर राष्ट्रवादीचं आंदोलन

March 24, 2021 0 Comments

नागपूर: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त व पोलिस महासंचालक परमबीरसिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, पोलिस दल हादरले आहे. त्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरयेथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली आहेत. नागपुराती बहूचर्चित हत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला असून फडणवीसांच्या घरासमोर निदर्शने केली आहेत. एकनाथ निमगडे यांच्या हत्याप्रकरणात नाव समोर आलेला कुख्यात गुंड रणजीत सफेलकर याचे भाजपच्या काही नेत्यासोबत संबंध असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. तसंच, एकनाथ निमगाडे यांच्या हत्याप्रकरणात फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान, पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांच्या निवासस्थानासमोर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सुरक्षेत वाढ केली. दोन्ही ठिकाणी पोलिसांचा प्रचंड ताफा तैनात करण्यात आला. या ठिकाणी सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले असून, फिक्स पॉइंट लावण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांच्या निवासस्थान परिसरातून जाणाऱ्या नागरिकांची पोलिसांनी कसून चौकशीही सुरू केली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: