रस्त्याच्या कामाकडे तब्बल ५ वर्षे दुर्लक्ष; शिवसैनिकांनी 'असा' केला निषेध

March 27, 2021 0 Comments

सोलापूर: केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होऊन पाच वर्षे उलटल्यानंतरही प्रत्यक्ष कामास सुरुवात न केल्याने शिवसेनेच्या वतीने सोलापुरातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांच्या कार्यालयात गांधीगिरीच्या मार्गानं आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांच्या पंचवर्षं आश्वासन पूर्तीचा निषेध म्हणून कदम यांच्या खुर्चीचा शाही सत्कार करण्यात आला. वाचा: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी २६ मार्च २०१६ रोजी, पाच वर्षांपूर्वी येथून ५ हजार कोटी रुपयांच्या रस्ते कामाचे उद्घाटन केलं होते. त्या कामांमध्ये शहरातून जाणाऱ्या राज्यमार्ग ९ चे चौपदरीकरण या १०७ कोटी रुपयांच्या कामाचाही समावेश होता. मात्र, गेल्या पाच वर्षांत या रस्त्यावर एक पाटी देखील टाकण्यात आली नाही. ना एक रुपयांचा खर्च करण्यात आला. त्या प्रलंबित कामाकडे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी शिवसैनिकांसह येऊन गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदवला आहे. वाचा: गेली अनेक वर्षे एकाच कार्यालयात तळ ठोकून बसलेले संजय कदम हे सध्या सोलापूर जिल्ह्यातील महामार्गांच्या कामाच्या निमित्ताने वादग्रस्त ठरत आहेत. रस्ते कामाच्या प्रकल्पबाधितांचे मूल्यांकन, त्याचा परतावा आणि कामाच्या प्राधान्यक्रमामुळे संजय कदम यांच्याविषयी अनेक तक्रारी आहेत. अशा तक्रारींपैकी एक पंढरपूर ते कुरुल पुणे-विजयपूर बायपासपर्यंत हा सुद्धा रस्ता प्रलंबित आहे. टेंभुर्णी येथील रस्त्यांच्या निमित्ताने संजय कदम यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यात आला आहे. प्रलंबित कामाची आठवण करून देण्यासाठी केलेलं हे गांधीगिरीचं आंदोलन मुंबई येथील डीजीएम महामार्ग अधिकारी आणि नितीन गडकरी यांचा सत्कार करून संपवणार असल्याचं संजय कोकाटे यांनी म्हटलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: