राठोडांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी 'या' आमदारांची नावे चर्चेत

March 01, 2021 0 Comments

म. टा. वृत्तसेवा, बुलडाणा राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे विदर्भातून आमदार व यांच्या नावाची चर्चा आता मंत्रिपदासाठी सुरू झाली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये तर्कवितर्क लावले जात असताना भाजपने आक्रमक भूमिका घेत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पोहरादेवी येथे शक्तिप्रदर्शन करताना राठोड यांनी चौकशीत सर्व काही समोर येईल, असेही म्हटले होते. मात्र शिवसेनेला आणि पर्यायाने सरकारला विरोधक लक्ष्य करीत असल्याने रविवारी राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अधिवेशनापूर्वी विरोधकांचा गदारोळ टाळण्याची खेळ सरकारने खेळली. वाचा: विदर्भाचा विचार करता शिवसेनेचे चार आमदार निवडून आले आहेत. मागील सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले राठोड यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. वन खात्याची धुरा ठाकरे यांनी त्यांच्या खांद्यावर दिली. मात्र आता त्यांच्या राजीनाम्यानंतर तीन टर्मपासून आमदार असलेले डॉ. रायमूलकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. २००९, २०१४ व २०१९ अशा तीन निवडणुकीत सलग चढत्या मताधिक्‍याने विजयी होण्याचा विक्रम रायमूलकर यांच्या नावावर आहे. मेहकर हा शिवसेनेचा गड म्हणूनदेखील गेल्या ३० वर्षांपासून कायम आहे. बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार आहेत. पक्ष संघटनही मजबूत आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात मंत्रिपद मिळणार, अशी आशा व्यक्त होत होती. तीन पक्षांच्या सत्तेत मंत्रिपदाच्या जागा कमी वाट्याला आल्याने रायमूलकर यांना पंचायत राज समितीचे प्रमुख म्हणून अलीकडेच जबाबदारी देण्यात आला होती. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रायमूलकर, जयस्वाल यांची वर्णी लागते की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा येत्या काळातील रंग पाहता त्या भागात मंत्रिपद जाते हे आता आगामी काळात स्पष्ट होणार आहे. विदर्भातील शिवसेनेचे बळ विदर्भातील शिवसेनेच्या चार जागांचा विचार करता संजय राठोड आणि संजय रायमूलकर यांनी विजयाची हॅट्‌ट्रिक केली आहे. नितीन देशमुख आणि संजय गायकवाड यांची पहिलीच टर्म आहे. याशिवाय भंडारा मतदारसंघातून मूळ शिवसैनिक असलेले नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष निवडून आले आहेत. सध्या त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभारदेखील आहे. या साऱ्यात रायमूलकर हे अनुभवी ठरत असल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यांच्या विजयाच्या सातत्याची पक्ष प्रमुखांकडून दखल घेतली जाणार काय, याकडे लक्ष लागून आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: