'बुरा ना मानो होली है'; संजय राऊतांचं ट्वीट चर्चेत

March 28, 2021 0 Comments

मुंबई: शिवसेना नेते हे अनेकदा फेसबुक व ट्विटरवर ते अनेकदा पोस्ट करत असतात. आजही होळीच्या निमित्तानं त्यांनी एक शेर ट्वीट केला आहे. त्यामुळं संजय राऊतांच्या या ट्वीटची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. गृहमंत्री यांनी मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर सामनाच्या रोखठोक या सदरातून संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत अनिल देशमुख हे अपघातानं गृहमंत्री झाले असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी एक खास ट्वीट केलं आहे. संजय राऊत यांनी एक शेर ट्वीट केला आहे. तसंच, कॅप्शनमध्ये बुरा ना मानो होली है, असं म्हटलं आहे. 'आसमान मे उडने की मनाई नही है, बस शर्त इतनी है की जमीन को नजर अंदाज ना करे, असं राऊतांनी म्हटलं आहे. आता संजय राऊत यांनी ट्विटमधून नेमका कोणावर निशाणा साधला आहे,' याबाबत चर्चा रंगली आहे. 'रोखठोक'मध्ये संजय राऊत काय म्हणाले? देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: