'महाराष्ट्राची वाट लावू नका'; माजी खासदाराचा अजित पवारांना टोला

March 29, 2021 0 Comments

मुंबई: राज्यात करोनाचा संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून पुन्हा एकदा निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. तर, राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. यावरुनच भाजपनं सरकारवर निशाणा साधला आहे. करोनावर संसर्ग मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीतनिर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा करण्यात आली. यावरुनच भाजप नेते निलेश राणेंनी उपमुख्यमंत्री निलेश राणेंनी सरकारवर व अजित उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. ' विसरलेत की ते नुसते उपमुख्यमंत्री नाही अर्थमंत्रीसुद्धा आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वत:हून सांगितलं पाहिजे की लॉकडाऊन हे महाराष्ट्राला परवडणार नाही. करोना हाताळण्यात सिस्टम दर्जेदार करा पण नोकरी धंद्याचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका,' असं ट्वीट निलेश राणेंनी केलं आहे. दरम्यान, काल पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना दिल्या. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल, असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: