पुणेकरांनो काळजी घ्या; पॉझिटिव्हिटी दरात पुणे नववे

March 28, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असला, तरी आठवड्याच्या (बाधित होण्याचे प्रमाण) पॉझिटिव्हिटी दरात पुण्याचा नववा क्रमांक लागतो आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा सर्वाधिक ४८.२० टक्के दर असून, पुण्याचा दर २४.६० टक्के आहे. पुण्यापेक्षा अकोला, बुलढाणा, ठाणे, नागपूर; तसेच जालना जिल्ह्यातील 'पॉझिटिव्हिटी'चे प्रमाण अधिक आहे. आरोग्य विभागाने राज्याचा आठवड्यातील पॉझिटिव्हिटी दर काढला आहे. त्याची तुलना करता त्यात सर्वाधिक आणि सर्वाधिक कमी असलेल्या जिल्ह्यांची माहिती समोर आली आहे. राज्याचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर २१.५२ टक्के आहे. राज्याच्या पॉझिटिव्हिटी दरापेक्षा १० जिल्ह्यांचा दर अधिक आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळत असली, तरी पॉझिटिव्हिटी दर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. राज्यात नंदूरबार जिल्ह्यात २०.१८ टक्के, तर नगर जिल्ह्यात १९.८५ टक्के दर असून, या दोन्ही जिल्ह्यांत राज्याच्या दरापेक्षा कमी पॉझिटिव्हिटी दर आहे. राज्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून संसर्ग वाढला. त्या वेळी पुणे, मुंबई, नागपूर, अकोला, बुलढाणा या पाच जिल्ह्यांत संसर्ग चांगला वाढला होता. त्याची तीव्रता सध्याही तशीच आहे. राज्यात आता रुग्णवाढीच्या दरात नांदेड जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. नांदेड जिल्ह्यात ३.२९ टक्के, तर नंदूरबारमध्ये ३.०४ टक्के, अकोल्यात २.७७ टक्के असा रुग्णवाढीचा दर आहे. पुणे जिल्ह्यात १.११ टक्के एवढा रुग्णवाढीचा आठवड्यातील दर आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांचा आठवड्याचा रुग्णवाढीचा दर राज्याच्या १.०९ टक्के या रुग्णवाढीच्या दरापेक्षा अधिक आहे, तर उर्वरीत जिल्ह्यांचा दर राज्याच्या रुग्णवाढी दरापेक्षा कमी आहे. राज्यात सर्वांत कमी ०.१३ टक्के एवढा रुग्णवाढीचा दर कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. गडचिरोली, सातारा, गोंदिया, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, रायगड, सोलापूर आदी जिल्ह्यांचा दर कमी आहे, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर जिल्हा ....................... पॉझिटिव्हिटी दर (टक्क्यांत) औरंगाबाद .............४८.२० जालना .................३८.०९ नागपूर.............३२.२० नाशिक ..............३१.७३ उस्मानाबाद .............२९.३१ बुलढाणा ...............२८.७० ठाणे ..............२६.९८ अकोला ...............२६.५९ पुणे.................२४.६० नांदेड ...............२१.६७ नंदूरबार.................२०.१८ राज्य .................२१.५२


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: