सोलापुरात करोना रुग्ण वाढले; प्रणिती शिंदे यांनी केली 'ही' मागणी

March 25, 2021 0 Comments

प्रवीण सपकाळ । शहरातील ईएसआय आणि रेल्वे हॉस्पिटलमध्ये पुन्हा उपचार सेंटर सुरू करण्यात यावं, अशी मागणी सोलापूर शहर मध्यच्या आमदार () यांनी केली आहे. या बाबतचं रीतसर निवेदन त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिलं आहे. गेल्या वर्षी संपूर्ण जगभरात करोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाला होता. सोलापूर शहरात सुद्धा covid-19 रुग्णांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे सोलापुरातील विविध हॉस्पिटल्ससोबत ई.एस.आय. हॉस्पिटल आणि रेल्वे हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. परंतु दरम्यानच्या काळामध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे ई.एस.आय. हॉस्पिटल आणि रेल्वे हॉस्पिटल मधील कोविड केंद्रे बंद करण्यात आली होती. वाचा: गेल्या महिन्यापासून सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासकीय छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व इतर शासकीय रुग्णालयावर ताण येत आहे. तिथे पुरेसे बेड उपलब्ध नाहीत. सध्या सर्वोपचार रुग्णालयात १७० बाधितांना दाखल करण्यात आले असून उपलब्ध बेडची संख्या ही फक्त १२० इतकी आहे. शिवाय कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील बंद असलेले ई.एस.आय. हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटलमधील कोविड सेंटर तात्काळ सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. ई.एस.आय व रेलवे हॉस्पिटलमधील बंद असलेली कोविड केंद्रे पुन्हा सुरू करून रुग्णाच्या उपचारांची सोय करून देण्यात यावी आणि बाधितांना वेळेत उपचार मिळावेत, अशी अपेक्षा प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: