'कलाकारांची चौकशी करण्याचा अधिकार, पण...'

March 05, 2021 0 Comments

मुंबईः अभिनेत्री आणि निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यपसह बॉलिवूडमधील काही लोकांविरोधात आयकर विभागानं केलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. () 'तापसी पन्नू आणि यांच्यावर झालेल्या कारवाईवर बॉलिवूडनं आवाज उठवायला हवा. फक्त बॉलिवूडचं नाही इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीनंही एकत्र यायला हवं. जर काही तपास करायचा असेल तर तो त्यांचा अधिकार आहे पण फक्त जे कलाकार, दिग्दर्शक शेतकऱ्यांना पाठिंबा देतात किंवा जे जेएनयूमधील विद्यार्थ्यांना पाठिंबा देतात, समाजमाध्यमांवर व्यक्त होतात. अशा काही मोजक्याच कलाकारांवर धाडी पडत असतील तर लोकांच्या मनात शंका येणारचं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलू नये म्हणून दडपण आणलं जात आहे. गप्प राहण्यास सांगितलं जात आहे,' असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. वाचाः 'आत्तापर्यंत या देशात जेव्हा जेव्हा व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी झाली आहे तेव्हा तेव्हा सिनेउद्योगातील अनेक दिग्गजांनी आवाज उठवला आहे. आणि आता जर कोणी या संदर्भात बोलत असेल तर त्यांना अशाप्रकारे गुन्हेगार व देशद्रोही ठरवून नये. चौकशी जरुर व्हावी पण ही पद्धत नाही, अशी टीकाही राऊतांनी केली आहे. वाचाः बॉलिवूडनं घाबरण्याचं काही काम नाही कारण भारत लोकशाही प्रधान देश आहे. पंतप्रधान लोकशाही मार्गानं देशाचं नेतृत्व करतात. देशातील प्रत्येक निवडणूक लोकशाही मार्गानं होतं. त्यामुळं देशात लोकशाही आहे असं मी मानतो,' असंही राऊत यांनी म्हटलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: