महाराष्ट्रातील 'हे' ठिकाण देशात सर्वाधिक उष्ण
म.टा. प्रतिनिधी, नागपूर विदर्भात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सोमवारी पारा चाळीशी पार पोहोचला. सोमवारी येथे देशातील सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल अकोल्यात ३९.५ आणि चंद्रपुरात ३९.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. त्यामुळे सोमवारी राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी पहिली तीन शहरे ही विदर्भातीलच होती. वाचा: गेल्या काही दिवसांत शहरातील कमाल आणि किमान या दोन्ही तापमानात वाढ झाली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच हळूहळू उन्हाळ्याचे वेध लागत आहेत. सोमवारी शहरातसुद्धा ३८.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. याखेरीज सोमवारी शहरात १८.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आता दिवसाच्या तापमानातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सिग्नल दरम्यान, विविध चौकांमध्ये सावली शोधणारे दुचाकीस्वार दिसू लागले आहेत. सहसा मार्च महिन्याच्या सुरुवातीला इतकी उष्णता नसते. मात्र, यंदा विदर्भातील तापमान मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापले आहे. त्यामुळे एप्रिल, मे मध्ये पारा कुठवर पोहोचणार, असा प्रश्न नागपूरकरांना पडू लागला आहे. पुढील चार दिवस वातावरण असेच कोरडे राहणार असून किमान तापमानही ३९ अंशांच्या आसपासच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. वाचा: देशातील सर्वाधिक उष्ण शहरे ब्रह्मपुरी : ४०.१ अकोला : ३९.५ चंद्रपूर: ३९.४ वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: