पश्चिम बंगालमध्ये भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेचा मोठा निर्णय

March 04, 2021 0 Comments

मुंबईः पश्चिम बंगालच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना शिवसेनेनं निवडणुकांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेनं पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. यासंबंधी खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेनं पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकां लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला होता. संजय राऊत यांनीच याबाबत अधिकृतरित्या घोषणा केली होती. आता मात्र शिवसेनेनं निवडणुका लढवण्याचा निर्णय बदलला आहे. शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका न लढवता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 'सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळं बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहे,' असं संजय राऊत यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसंच, हा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन घेतला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: