मंदिरे पुन्हा बंद होणार? शिर्डी, शनिशिंगणापुरातील गर्दीचा ओघ आटला!

March 30, 2021 0 Comments

अहमदनगर: करोनाचा उद्रेक पुन्हा वाढल्यानंतर मधल्या काळात व येथे होऊ लागलेली भाविकांची गर्दी पुन्हा घटली आहे. शिर्डीत दिवसभरात सहा ते सात हजार तर शनिशिंगणापूरला पाचशे ते सातशे भाविक येत असल्याचे सांगण्यात येते. मागील वेळी सुरुवातीच्या टप्प्यातच मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. आता पुन्हा उद्रेक झाल्याने लॉकडाऊनच्या आधी असाच निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मंदिरांवर अवलंबून असलेले व्यावसायिक मात्र चांगलेच अडचणीत आले आहेत. करोनाची साथ येण्यापूर्वी शिर्डीत लाखो भाविक येत असत. गेल्यावर्षी करोनाच्या सूरवातीलाच मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जनता कर्फ्यूसारखे प्रयोग होण्याच्या आधीच मंदिरे बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत सर्वांत उशिरा मंदीरे खुले करण्यात आली. अनेक बंधने घालून दर्शन व्यवस्था सुरू झाली. त्यामुळे बंद पडलेले व्यावसाय पुन्हा सुरू झाले होते. वाचा: या काळात शिर्डीत सुरवातीला दररोज पंधरा हजार तर अलीकडेच तीस हजार भाविक प्रतिदिन दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अनलॉकनंतरच्या सुरवातीच्या काळात गर्दी रोखण्याचे आव्हान होते. आता मात्र, करोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यापासून भाविकांची संख्या आपोआप घटली आहे. शिर्डीत सध्या दररोज पाच ते सात हजार भाविक येत आहेत. गुरूवार, शनिवार आणि रविवार या गर्दी होणाऱ्या दिवशी ही संख्या दहा हजारावर जात आहे. साईप्रसादलयात दररोज ४० हजार भाविकांची सोय करण्यात आली असली तर सध्या फक्त सहा ते सात हजार भाविक त्याचा लाभ घेत आहेत. मधल्या काळात बंद करण्यात आलेल्या बुंदी लाडू आणि प्रसादलयाच्या सुविधा पुन्हा सुरू करण्यात आल्या असल्या तरी भाविकांनी मात्र शिर्डीकडे पाठ फिरविली आहे. या परिणाम शिर्डीतील सर्व प्रकारच्या व्यावसायांवर झाला आहे. सतत गजबलेला दर्शनमार्ग, मंदीर परिसर, रस्ते पुन्हा ओस पडलेले दिसत आहेत. वाचा: शनिशिंगणापूरलाही गर्दी ओसरली आहे. तेथेही दररोज केवळ पाचशे ते सातशे भाविक येत असल्याचे सांगण्यात आले. तेथेही मंदिरावर अवलंबून असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे व्यावसायही अडचणीत आले आहेत. सलग सुट्ट्या असूनही नेहमीच्या तुलनेत खूपच कमी भाविक दर्शनासाठी येत आहेत. मुख्य म्हणजे या दोन्ही ठिकाणी मुक्कामी येणाऱ्या भाविकांचे प्रमाण तर कमालीचे घटले आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसाय अडचणीत आला आहे. वाचा: असे असताना आता लवकरच पुन्हा मंदिरे बंद केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील काही प्रमुख देवस्थानांनी यापूर्वीच निर्णय घेऊन मंदिरे भाविकांसाठी बंद केली आहेत, तर कोठे अनेक निर्बंध आणले आहेत. आता शिर्डी, शनिशिंगणापूरसह सर्वच मंदिरे आणि धार्मिक स्थळांच्या बाबतीत राज्य स्तरावरूनच काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे. शाळांसह अन्य गर्दीचे उपक्रम आणि व्यावसायांवर कडक निर्बंध आणि काही बंद ठेवण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिरांसंबंधीही सरकार लवकर भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी सरकारने येथील व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: