घाव वर्मी बसलाय; फडणवीसांचा शिवसेनेला टोला
नागपूर: 'विरोधी पक्ष काय करतोय?' अशा शीर्षकाखाली शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'नं लिहिलेल्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी या अग्रलेखावरून शिवसेनेला बोचरा टोला हाणला आहे. 'सामनात अग्रलेख आला म्हणजे घाव वर्मी बसलाय,' असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. () वाचा: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल समारोप झाला. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी मनसुख हिरण प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांची कोंडी केली होती. विरोधकांच्या या दबावामुळं सरकारला पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली करावी लागली. शिवसेनेनं विरोधकांच्या या भूमिकेवर सामनातून जोरदार टीका केली आहे. लोकांना जगण्या-मरण्याचे प्रश्न सतावत असताना त्यावर बोलायचे सोडून विरोधी पक्षाने एका संशयास्पद मृत्यूचा धड तपासही होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे, अशी टीका शिवसेनेनं केली आहे. वाचा: आज सकाळीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या सोबत नागपुरात दाखल झालेल्या फडणवीस यांना या टीकेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी खोचक टिप्पणी केली. 'जनहिताचे मुद्दे उचलणं ही जशी विरोधी पक्षाची जबाबदारी आहे, तशीच ती वृत्तपत्रांचीही जबाबदारी आहे. आम्ही विधिमंडळात विजेच्या प्रश्नावर बोललो, शेतकऱ्यांबदद्ल बोललो, कोविडच्या परिस्थितीवर बोललो. पण ते मुद्दे त्यांना दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. 'सामना'त अग्रलेख आला म्हणजे घाव वर्मी बसलाय. ते सुधीरभाऊंनाच विचारा! महाविकास आघाडी सरकारकडं फक्त तीन महिन्यांचा वेळ उरलाय, असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभेत केलं होतं. त्यावरून सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांची चर्चा सुरू झाली होती. ते खरं आहे का याबद्दल विचारलं असता, 'ते सुधीरभाऊंनाच माहीत आहे. त्यांनाच विचारा,' असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: