विद्रोही साहित्य संमेलनालाही स्थगिती?
नाशिकः २६ ते २८ मार्च दरम्यान होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळानं घेतला आहे. त्यानंतर पंधरावं विद्रोही साहित्य संमेलनाही स्थगित होण्याची शक्यता आहे. राज्यात करोनाचा प्रभाव वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्ये होणारे साहित्य संमेलन पुढे ढकलावे अथवा ऑनलाईन पद्धतीने घ्यावे असा सुर साहित्यिकांमधून व नाशिककरांकडूनही आळवला जात होता. राज्यात सध्या मुंबई पुणे, ठाणे आणि विदर्भ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार वाढतो आहे. यासाठी आयोजकांनी सावध भूमिका घेऊन संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. साहित्य संमेलनाचा निर्णयानंतर विद्रोही साहित्य संमेलनाबाबतही आज सायंकाळी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे. विद्रोही साहित्य संमेलनाच्या समित्यांमधील चार जणांना करोनाची लागण झाली असून करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देखील स्थगित होण्याची शक्यता असल्याने संयोजन समितीतील सूत्रांनी सांगितले आहे. ग्रेटा थनबर्गला निमंत्रण देणार असल्याच्या चर्चा विद्रोही साहित्य संमेलन २५ आणि २६ मार्च रोजी आयोजण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. आनंद पाटील हे भूषवणार असल्याची चर्चा आहे. तर, या संमेलनाच्या उद्घाटनास ग्रेटा थनबर्गला निमंत्रण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: