ही बातमी कायम लक्षात राहील: शरद पवार

March 26, 2021 0 Comments

मुंबई: ज्येष्ठ गायिका यांना राज्य सरकारचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 'आशाताईंचा आवाज जसा कायमचा स्मरणात राहील, तशीच ही बातमीही कायम लक्षात राहील,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. (Sharad Pawar Reaction on Maharashtra Bhushan Award) वाचा: शरद पवार यांनी ट्वीट करून आशा भोसले यांचं अभिनंदन केलं असून राज्य सरकारचेही आभार मानले आहेत. 'आशाताई यांचा आवाज, त्यांची गाण्याची लकब, भावगीतांसाठी त्यांचे योगदान या सगळ्या गोष्टी मनाला आनंद देणाऱ्या आहेत. मोठ्या झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही म्हणतात. लतादीदींसारख्या थोर व्यक्तींच्या भगिनी असल्याने आपले स्वतंत्र अस्तित्व तयार करणे अतिशय अवघड गोष्ट होती. पण आशाताईंनी अतिशय कष्ट घेऊन संगीत क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि या क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांना महाराष्ट्र सरकारनं आज सन्मानित केलं ही अतिशय आनंदाची बाब आहे. मी आशाताईंचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो आणि राज्य सरकारला धन्यवाद देतो,' असं पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. वाचा: 'संगीताच्या क्षेत्रात मंगेशकर कुटुंबीयांचे ऐतिहासिक योगदान आहे. सर्वच मंगेशकर बंधु-भगिनींनी या क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. लता दीदी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला याचा अभिमान प्रत्येकाला आहे, तसाच अभिमान आशाताईंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वांना वाटेल,' असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: