ती इनोव्हा परमबीर सिंग यांच्या कार्यालयातील; काँग्रेसला शंका

March 27, 2021 0 Comments

मुंबई: 'रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू अधिकारी आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. परमबीर सिंह यांची चौकशी होऊ नये आणि त्यावरुन लक्ष्य वळवण्यासाठी हे प्रकरण सात महिन्यांनंतर पुन्हा काढण्यात का आलं?;' असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते यांनी केला आहे. प्रकरण, मनसुख हिरन हत्याप्रकरण व फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं सरकारला घेरलं असून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तर, काँग्रेसनं भाजपच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे. 'अर्णब गोस्वामी प्रकरणात यांना पंतप्रधानांनी ३११ कलम अधिकारानुसार बडतर्फ करावं, अशी मागणी भाजपनं केली होती. मग अचानक परमबीर सिंग भाजपला विश्वासू व प्रिय वाटायला लागले?,' असा सवालही त्यांनी केला आहे. 'अंबानींच्या घरासमोर वाझेंनी कार उभी केल्यानंतर त्या काळात वाझे कोणाकोणाला भेटले?, असा सवाल ही सावंत यांनी उपस्थित केला आहे. सचिन वाझेंनी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात थेट परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली होती. वाझे हे एपीआय दर्जाचे अधिकारी होते. त्यांच्यावर अनेक वरिष्ठ अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांना बायपास करून वाझेंनी थेट सिंग यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे वाझे सिंग यांच्या किती जवळचे होते हे स्पष्ट होते. तसेच वाझेंचं कार्यालय ही सिंग यांच्या कार्यालयाच्या २०० फुटाच्या अंतरावर होते. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा गाडीही सिंग यांच्या कार्यालयातीलच आहे. तसंच वाझे वारंवार सिंग यांना थेट भेटायचे. त्यामुळे वाझे हे कुणाच्या संपर्कात होते आणि जवळचे होते हे स्पष्ट होत आहे,' अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. '१० मार्चला एटीएसनं पत्र लिहून परमबीर सिंग यांच्या कार्यालयातील डिव्हीआर मागितला. तेव्हा तो डीव्हीआर दिला गेला. मात्र, त्यानंतर दीड दोन तासांत एटीएसच्या प्रमुखांना फोन जातो डीव्हीआर नीट दिसत नाहीये आम्ही तो दुरुस्त करुन पुन्हा देतो. मात्र आता तो डीव्हीआर गायब झाला आहे. याची चौकशी होण्याची गरज आहे,' अशी मागणीही त्यांनी केली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: