भाजप आमदार गणेश नाईकांच्या नातवाला मारहाण

March 26, 2021 0 Comments

म. टा. वृत्तसेवा, ठाणे माजी मंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार यांच्या नातवाला किरकोळ अपघातानंतर मारहाण झाल्याची घटना बुधवारी मुरबाड तालुक्यातील टोकावडे गावाजवळ घडली. माळशेज घाट परिसरातील तळवली गावाच्या हद्दीत हा प्रकार घडला. गणेश नाईक यांचा नातू आणि त्याच्यासोबत असणारे तजेंद्रसिंग हरजितसिंग मंत्री या दोघांना मारहाण झाली. मुरबाड तालुक्यातील नाईक कुटुंबांच्या कृषी केंद्रांकडे हे दोघे निघाले असताना तळवली गावाच्या हद्दीत त्यांनी अचानक आपली गाडी वळवली. त्यामुळे मागून येणारा प्रवीण रघुनाथ लिहे हा दुचाकीस्वार पडला. संकल्प नाईक आणि तेजेंद्रसिंग मंत्री यांनी त्वरित थांबून त्या दुचाकीस्वाराची विचारपूस केली. त्याचवेळी समोरील हॉटेलमध्ये असलेल्या नीलेश देसले आणि त्याच्या तीन साथीदारांनी त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर तेजेंद्रसिंग मंत्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टोकावडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: