काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन माजी आमदार राष्ट्रवादीमध्ये

March 25, 2021 0 Comments

नाशिक: महिनाभरापूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे मालेगावचे माजी आमदार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री , अन्न व नागरी पुरवठा मंत्री , प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीचे 'घड्याळ' हाती बांधले. त्यांच्यासोबत १५ माजी नगरसेवकांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला. शेख यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. (Former MLA from Asif Shaikh Joins NCP) वाचा: एक दशकाहून अधिक काळ काँग्रेसममध्ये घालविल्यानंतर शेख यांनी मागील महिन्यात अचानक काँग्रेसला अलविदा केला होता. यानंतर त्यांनी शहरात चौक सभा, बैठका घेऊन पुढील राजकीय वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी कार्यकर्ते, नागरिक यांच्याशी चर्चा केली होती. तसेच जाहीर सभा घेऊन काँग्रेसला राजीनामा का दिला याविषयी सांगत जनमताचा कौल घेतला होता. त्या सभेतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयात करोनाचे नियम पाळून हा प्रवेशाचा सोहळा पार पडला. त्यावेळी मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. छगन भुजबळ यांनी माजी आमदार आसिफ शेख रशीद यांचे पक्षात स्वागत केले. मालेगावच्या विकासासाठी एकत्र काम केलं जाईल. आसिफ शेख रशीद यांना मालेगावच्या विकासासाठी आम्ही संपूर्ण ताकद देऊ. त्यांच्या पाठीमागे पक्ष देखील उभी राहील, असं आश्वासन भुजबळ यांनी यावेळी दिलं. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: