दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: चित्रा वाघ आक्रमक, म्हणाल्या...

March 29, 2021 0 Comments

मुंबई: महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणात अपर मुख्य प्रधान वन सरंक्षक रेड्डी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व या प्रकरणाचा तपास अमरावतीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून काढून घेऊन अन्य निष्पक्ष अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष यांनी केली आहे. 'दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस शिवकुमार हे एकटे जबाबदार नाहीत. दीपालीच्या तक्रारीची दखल न घेता शिवकुमार यांना वेळोवेळी पाठीशी घालणारे रेड्डी हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनाही सेवेतून निलंबित करून अटक करण्याची आमची मागणी आहे. मात्र, सरकारनं रेड्डी यांची बदली करून त्यांना अभयच दिलं आहे. दीपाली चव्हाण यांची हत्या या व्यवस्थेनं केली आहे. आता शिवकुमार यांना वाचविण्याचे प्रयत्न पोलीस यंत्रणेकडून सुरू झाले आहेत. शिवकुमार यांची तीन दिवसाची पोलिस कोठडी सोमवारी संपल्यावर त्यांच्या जामीनासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील. त्यामुळं शिवकुमारसह रेड्डी यांच्यावरही ३०२ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. दीपाली चव्हाण यांनी खासदार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तातडीनं या प्रकरणाची दखल घेत रेड्डी यांच्याशी संपर्क साधला होता. शिवकुमार यांच्या बद्दलच्या दीपालींच्या तक्रारी सांगितल्या होत्या. नवनीत राणा यांनी या संदर्भात तत्कालीन वनमंत्री यांना पत्र पाठवले होते. मात्र, राणा यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले गेले, असा आरोपही वाघ यांनी केला आहे. 'शिवकुमार आणि अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. हे लक्षात घेता अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांकडून हा तपास काढून घ्यावा,' अशी मागणीही त्यांनी केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: