डॉक्टरांचा सल्ला घेत होतात की कंपाऊंडरचाः देवेंद्र फडणवीस

March 02, 2021 0 Comments

मुंबईः 'महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या ९ टक्के आहे. महाराष्ट्रात करोनामुळं ५२ हजार १८४ मृत्यू झाले आहेत, म्हणजे ३३ ते ३४ टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहे. कशाची पाठ थोपटून घेतो आपण. त्यामुळं मला कधी कधी खरंच वाटतं की राज्य डॉक्टरचा सल्ला घेतंय की कंपाउडरचा, अशी खोचक टीका राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते यांनी सरकारवर केली आहे. आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. देवेंद्र फडणवीस यांनी करोना परिस्थितीवरुन राज्य सरकारला कोंडीत पकडलं आहे. 'देशाच्या ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत. देशाच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्रात सक्रीय रुग्णांचं प्रमाण ४६ टक्के आहे. त्यामुळं मी पहिल्या दिवसांपासून सांगतोय की आपण चाचण्याच कमी करतोय. चाचण्यांची संख्या कमी कमी होत आहे. तरीदेखील करोना संक्रमणाची जी परिस्थिती पाहायला मिळतेय ती आश्चर्यजनक आहे आणि यात काय चाललंय ते कळत नाहीये, अशी शंका देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केली आहे. अमरावतीत करण्यात आलेल्या लॉकडाऊनवरही फडणवीसांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अमरावतीत पॉझिटिव्ह अहवाल देण्याचं रॅकेट समोर आलंय. नवी मुंबईत चाचण्या न करताच पॉझिटिव्ह अहवाल देण्याचं रॅकेट समोर आलंय. खरंतररुग्णसंख्या खरंच वाढतेय का, की याच्यामागे काय नेमकं आहे, असे प्रश्न समोर येतात, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमरावतीत जिल्हा परिषदेच्या सदस्यानं चाचणी केल्यानंतर त्यांना फोन आला तुम्हाला रिपोर्ट पॉझिटिव्ह हवाय की निगेटिव्ह. त्यानंतर अमरावतीत लॉकडाऊन करण्यात आलं. ते लॉकडाऊन कशाच्या आधारावर केलंय. ज्याला जे मनात येईल ते करतो, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. वाचाः 'लॉकडाउन केलं कारण त्या काळात व्यवस्था नव्हती, निदान नव्हतं, मृत्यूदर जास्त होता. तेव्हा लॉकडाऊन करणं आवश्यक होतं. पण आता कोणीतरी मंत्री जातो आणि लॉकडाऊन करा असं सांगतोय, कोणी अधिकारी जातो आणि सांगतो लॉकडाऊन करा. पण लॉकडाऊन करताय तर छोट्या व्यापाऱ्याला मदत करणार आहात का?, असा सवालही त्यांनी केला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: