घरखरेदीत पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर

March 08, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई विविध प्रकारच्या सवलतींच्या लाटेवर असलेल्या घरखरेदीचा आलेख मुंबईत सध्या चढता आहे. विशेष म्हणजे, घर खरेदीत पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत. जिथे ६८ टक्के पुरुषांना राहण्यासाठी घर खरेदी करायचे आहे, तिथे असे घर खरेदी करणाऱ्या महिलांची टक्केवारी तब्बल ८२ टक्के आहे. 'अॅनारॉक' या मुंबईतील संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. वाचा: या सर्वेक्षणानुसार, मुंबईसारख्या शहरात कुटुंबात गुंतवणूक म्हणून विचार समोर आल्यास ६२ टक्के महिलांचे प्राधान्य घर खरेदीला असते. त्या तुलनेत ५४ टक्के पुरुष हे घरखरेदीपेक्षा भांडवली बाजार व सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देतात. घर खरेदी करताना १८ टक्के महिला गुंतवणूक म्हणून घर खरेदी करतात, तर उर्वरित ८२ टक्के महिलांना घर राहण्यासाठीच खरेदी करायचे आहे. आर्थिक सुरक्षा म्हणून घर खरेदी करणाऱ्या महिलांचे प्रमाण ३१ टक्के आहे. एकूण महिला खरेदीदारांपैकी ४६ टक्के महिलांना ३ बीएचके, तर ३० टक्के महिलांना २ बीएचके फ्लॅट हवा असतो. पण ६६ टक्के महिलांना ९० लाख रुपयांहून कमी किमतीत फ्लॅट हवा असल्याचे आढळले. या सर्व स्थितीत सध्या घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याचा सर्वोत्तम काळ असल्याचे ७० टक्के महिला खरेदीदारांना वाटत आहे. एकूण सर्व महिलांचा विचार केल्यास ७१ टक्के महिलांना तयार फ्लॅट खरेदी करायचा असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. वाचा: नव्या पिढीतील महिला या घरखरेदीमध्ये निर्णायक ठरत आहेत. एक गृहिणीखेरीज घराची मालक किंवा खरेदीदार, ही भूमिका त्या हिरीरीने वठवत आहेत. शहरात होणारे स्थलांतर आणि महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य यामुळे महिला प्रबळ घर खरेदीदार ठरत आहेत. करोना संकटानंतर कुटुंबाची सुरक्षा महत्त्वाची ठरल्याने आर्थिक सुरक्षा देणाऱ्या घर खरेदीत महिला आघाडीवर आहेत. महिलांना कर्जावरील व्याजदरात मिळणारी सवलतही महत्त्वाची ठरते. क्षेत्रात सकारात्मक बदल आणणारे हे क्रांतिकारी चित्र आहे. - निरंजन हिरानंदानी, अध्यक्ष, नरेडको राष्ट्रीय


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: