चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये फरक असतो: उद्धव ठाकरे

March 30, 2021 0 Comments

नाशिक: 'चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. खऱ्या पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते. त्यांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो. केले तर का केले आणि नाही केले तर का नाही केले? याचंही उत्तर द्यावं लागतं,' असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री यांनी आज केलं. नाशिकच्या प्रबोधिनीतील उपनिरीक्षकांच्या ११८ व्या सत्राचा दीक्षांत संचलन समारंभ नुकताच पार पडला. या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. पोलिसांच्या कामाचे त्यांनी यावेळी तोंडभरून कौतुक केले. 'पोलीस आज एका बाजूला नक्षलवादाचा आणि दुसऱ्या बाजूला करोनाचा मुकाबला करत आहेत. दिसणाऱ्या शत्रूवर तुटून पडता येते. पण करोनासारख्या न दिसणाऱ्या शत्रूच्या विरोधात हे शस्त्र चालत नाही. तरीही आपल्या पोलिसांनी या लढाईचं आव्हान स्वीकारलं आहे. समाजासाठी, लोकांसाठी ते करोना काळातही कर्तव्य बजावत आहेत,' असं मुख्यमंत्री म्हणाले. वाचा: 'करोनाचा विषाणू जसे रूप बदलतो आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारी रूप बदलत आहे. आता ऑनलाइन गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. बँकिंग क्षेत्रातील ऑनलाइन गुन्ह्यांचा बंदोबस्त आता करावा लागणार आहे. गुन्हे ऑनलाइन होत असले, तरी त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचून त्याला प्रत्यक्ष खऱ्या बेड्या घालव्या लागणार आहेत. त्यामुळे जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. वाचा: 'प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर आता तुमची भूमिका व्यापक झाली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्र हेच तुमचे कुटुंब आहे. या कुटुंबाला आता तुमचा आधार असणार आहे. तुमच्या स्वप्नात आता महाराष्ट्राचे स्वप्न मिसळून पाहावे लागणार आहे. तुम्हाला रक्षक, भाऊ, पुत्र म्हणून काम करावे लागणार आहे. लोक तुमच्याकडे विश्वासाने येणार आहेत. त्या जनतेचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवाल,' अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: