चौकातले भाषण राज्यपालांकडे पाठवले!; फडणवीस ठाकरे सरकारवर बरसले

March 02, 2021 0 Comments

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत असून राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आज विरोधी पक्षनेते यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर टीकेचे बाण सोडले. राज्यपालांनी केलेल्या १२ पानी भाषणात मला कुठेही यशोगाथा दिसली नाही. जसं एखाद्या चौकात भाषण केलं जातं तसंच भाषण राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवलं, अशा शब्दांत फडणवीस यांनी निशाणा साधला. ( ) वाचा: राज्यपालांचं भाषण ऐकल्यानंतर मला प्रश्न पडला. साहित्याचे अनेक प्रकार आहेत त्यातल्या कोणत्या प्रकारात हे भाषण मोडते हे पडताळले असता हे एखाद्या चौकातलं भाषण असल्याचं माझं मत बनलं. त्यात यशोगाथा नाही, तर व्यथा आणि वेदनाच दिसल्या, असे नमूद करताना यमक जुळवणारी भाषा यशाचे गमक होऊ शकत नाही, असा टोला फडणवीसांनी हाणला. सरकार म्हणून आपण बाजू मांडतो तेव्हा समर्पक आकडेवारी मांडायची असते ती यात कुठेच दिसली नाही. आपल्या अपयशाचा लेखोजोखा समोर येईल या भीतीने सरकारने आकडेवारी लपवली आहे. जंबो सेंटर्समध्ये कुणाकुणाची घरे भरली याचा तपशील दिला असतात तर बरं वाटलं असतं, असा टोलाच फडणवीस यांनी लगावला. वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून कोविड नियंत्रणासाठी ' माझे कुटुंब माझी जबाबदारी ' ही मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम यशस्वी ठरल्याचा दावा सरकारने केलेला आहे. त्यावरून फडणवीस यांनी टोलेबाजी केली. माझे कुटुंब माझी जबाबदारी असे जनतेला सांगून सरकारने एकप्रकारे हात झटकण्याचे काम केले आहे, असे नमूद करत राज्यातील कोविड स्थितीवर फडणवीसांनी बोट ठेवले. देशातील ४० टक्के कोविड रुग्ण महाराष्ट्रात आहेत आणि एकूण मृत्यूंच्या ३५ टक्के मृत्यू आपल्या राज्यात झाले आहेत. तरीही सरकार काय म्हणून आपली पाठ थोपटून घेत आहे?, असा सवाल फडणवीस यांनी केला. सध्या जी रुग्णसंख्या वाढली आहे ती खरी आहे की वाढवली, असा सवाल विचारताना फडणवीस यांनी लॉकडाऊनवरूनही निशाणा साधला. लॉकडाऊन करण्यासाठी सगळेच तत्पर आहेत. मंत्री, अधिकारी कुणी मनात येईल तो लॉकडाऊन करतोय, असे सांगत फडणवीसांनी यावर आक्षेप घेतला. वाचा: राज्यपाल यांना सरकारी विमानातून प्रवास नाकारण्यात आला होता. विमानात १५ मिनिटं बसून राहिल्यानंतर राज्यपालांना उतरावं लागलं व दुसऱ्या विमानाने रवाना व्हावं लागलं होतं. त्यावरून फडणवीस यांनी सरकारवर तोफ डागली. राज्यपाल व सरकार यांच्यामध्ये अ. र. अंतुले व विलासराव देशमुख यांच्या काळातही वाद झाले होते मात्र राज्यपालांबाबत असा प्रकार कधी घडला नाही. राज्यपाल विमानात जाऊन बसल्यानंतर त्यांना प्रवासाची परवानगी नाकारण्यात आली. हा एका व्यक्तीचा नाही तर त्या पदाचा अपमान आहे, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री वा राज्यपाल यापैकी कुणाला विमान द्यायचं असा प्रसंग येतो तेव्हा राज्यपालांना विमान दिलं जातं, असं नमूद करताना फडणीसांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या विमानात इंधन का भरलं गेलं होतं?, राज्यपालांना परवानगी दिली नव्हती मग त्यांना बोर्डिंग पास कसा मिळाला?, ते विमानात जाऊन कसे बसले?, अशा प्रश्नांची सरबत्ती सरकारवर करतानाच राज्यपाल व तुमच्यात काही मतभेद असतीलही पण त्यावरून मनाचा इतका कोतेपणा दाखवू नका, असा सल्लाच फडणवीसांनी सरकारला दिला. रोज तुम्ही ज्या राज्यपालांना अपमानित करता, आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आलाय याचं समाधान वाटतं, असेही यावेळी फडणवीस म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: