बोगस कर्ज प्रकरण: पुणे पोलिसांचे नगरमध्ये छापे, नगर अर्बन बँकेच्या माजी संचालकांची धरपकड

March 06, 2021 0 Comments

अहमदनगर: नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत २२ कोटी रुपयांच्या बोगस कर्जप्रकरणात आरोपी असलेल्या तत्कालीन संचालकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे नगर शहरात छापे टाकून दोघांना ताब्यात घेतले. पोलिस येणार असल्याची माहिती मिळाल्याने अन्य आरोपी फरार झाले आहेत. (Nagar Urban Co-operative Bank Loan Scam) भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात हा गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. सध्या बँकेचे संचालकमंडळ बरखास्त करण्यात आलेले असून प्रशासकामार्फत कारभार पाहिला जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. वाचा: बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे (वय रा. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी ११ कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आली होती. मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक करण्यात आली होती. २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ या काळात हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कर्ज घेणाऱ्या यज्ञेश चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, नगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बँकेचे संचालक मंडळ सदस्य यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा: या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांचे पथक शनिवारी पहाटे नगरला आले. त्यांनी काही ठिकाणी शोध मोहीम राबविली. पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक वसंत बाबर यांचे पथक ही कारवाई करीत आहे. त्यांनी तत्कालीन संचालक नवनीत सुरापुरिया यांच्यासह दोघांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. अन्य आरोपी मात्र अद्याप हाती लागलेले नाहीत. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: