Sangli News: 'त्या' आलीशान कार विकणाऱ्या टोळीचा 'असा' केला पर्दाफाश

February 25, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, : महापुरात गाड्या खराब झाल्याचे सांगून केंद्र सरकारने विक्रीसाठी बंदी घातलेल्या बीएस ४ इंजिन व्हेरिएंटच्या आलीशान कार विकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. बंदी असलेल्या कार स्क्रॅप करण्याऐवजी त्या महापुरात खराब झाल्याचे सांगून बोगस नंबरप्लेट लावून, विक्री करणारी टोळी सांगलीत सक्रीय होती. मिरजेतील म्हैसाळ रोडवरील टोलनाक्याजवळ छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी सचिन तमन्ना रामगोंडावरू ( वय २७, रा. कोगनोळी ता. कवठेमहांकाळ), अभय ज्ञानेश्वर पवार ( वय ३९ रा. चिंचवड), आनम अस्लम सिद्दीकी (वय ४२ रा. चेंबूर, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. अभिजित सावंत हा संशयित पसार आहे. अटकेतील तिघांकडून तब्बल ३७ लाख ८० हजारांच्या आलिशान कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन रामगोंडावरू हा ते म्हैसाळ रोडवरील जुन्या टोल नाक्याच्या पुढे असलेल्या पत्र्याच्या शेडसमोर केंद्र सरकारने मार्च २०१९ पासून उत्पादन व विक्रीसाठी बंद केलेल्या बीएस ४ इंजिनच्या चारचाकी गाड्या स्क्रॅप करण्याऐवजी त्या पुराच्या पाण्यात खराब झाल्याचे सांगून कमी किंमतीमध्ये बेकायदेशीरपणे विकत होते. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या प्रकाराची खात्री करून केली. बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी छापा टाकून सचिन रामगोंडावरू यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन महागड्या कार जप्त केल्या. त्यावेळी ताब्यात असलेल्या दोन कारबाबत चौकशी केली असता, एका महिन्यापूर्वी त्याच्या व्यवसायातून ओळख झालेल्या आनम असलम सिद्धीकी याच्याकडून विक्री करण्यासाठी पार्टनर अभय ज्ञानेश्वर पवार याने त्या दिल्या होत्या, अशी माहिती मिळाली. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात तोटा झाल्याने तो भरून काढण्यासाठी कारना बोगस नंबरप्लेट लावून कमी दरामध्ये ते विक्री करीत होते, असे त्याने सांगितले. तसेच या कार आनम सिद्धीकी याने पनवेल यार्डातून; तसेच सांगली येथील चौगुले यांच्या यार्डातून लॉटमध्ये घेतलेल्या होत्या. त्या कार आनम याने वेगवेगळया एजंटमार्फत विक्री केल्या आहेत. तसेच अभय पवार याने आनम सिद्धीकी याने दिलेल्या कारपैकी ३ कार कोल्हापूर येथील अभिजीत सावंत याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी आरटीओ अॅपवर कारच्या आरटीओ नंबरची पडताळणी केली असता, दोन्ही कारवर असलेले नंबर व प्रत्यक्ष अॅपवरील माहिती यामध्ये तफावत आढळल्याने त्या नंबरप्लेट बनावट असल्याची खात्री झाली. संशयित तिघांनी पुराच्या पाण्यात बुडालेल्या बीएस ४ इंजिनच्या कार कंपनीने स्क्रॅप करण्याच्या सूचना दिल्या असतानाही त्यांची विक्री केली आहे. एकूण ३७ लाख ८० हजार रुपयाच्या विक्री केलेल्या आलीशान कार पोलिसांनी जप्त केल्या. अटकेतील संशयितांकडून आणखी काही कार मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: