Pune Metro: पुण्यातील मेट्रोच्या तिसऱ्या मार्गासाठी मागणीच केली नाही- प्रकाश जावडेकर

February 08, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, पुणे ‘पुण्यातील मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या दोन मार्गांसाठी दोन हजार १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, शिवाजीनगर ते हिंजवडी या तिसऱ्या मार्गासाठी निधीची मागणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात या निधीचा उल्लेख नाही,’ असे केंद्रीय मंत्री (Prakash Javadekar) यांनी रविवारी स्पष्ट केले. पुण्यात मेट्रो रेल्वे प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर उपनगरांमध्येही मेट्रो मार्गांची मागणी झाल्यास त्याबाबत विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (no demand was made for the third line in pune says ) केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जावडेकर यांनी ही माहिती दिली. या वेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे आणि सुनिल कांबळे, भाजचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आदी उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, ‘केंद्रीय अर्थसंकल्पात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी विविध शहरांमध्ये मेट्रोच्या कामांचा विस्तार आणि २० हजार नव्या बस सुरू करण्याची तरतूद आहे. पुण्यातील मेट्रोच्या तिसऱ्या मार्गासाठी मागणी करण्यात आली नव्हती. या अर्थसंकल्पात कात्रज-कोंढवा उड्डाणपुलासाठी तरतूद आहे. एकलव्य विद्यालय ही योजना आखण्यात आली असून, त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात या शाळा सुरू करण्यासाठी प्रत्येकी ३८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.’ ‘पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीवर अवलंबून असल्याने भविष्यात या किमती कमी होतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे १३७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ‘पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना’ प्रस्तावित असून, त्यामध्ये ६४ हजार १८० कोटी रुपयांची तरतूद आहे. करोनावरील लसीसाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद असून, गरज भासल्यास ही तरतूद आणखी वाढविण्यात येणार आहे,’ असे ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- ‘या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा आणि शेतकरी हिताला प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून शेतकऱ्यांना त्यांच्या पीक खर्चाच्या दीडपट किमान हमी भाव देण्याची तरतूद सरकारने कायम ठेवली आहे. एक हजार बाजार समित्यांना राष्ट्रीय ई-बाजारपेठेशी जोडण्याची तरतूद आहे,’ असेही त्यांनी सांगितले. करोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक स्त्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी नवीन कर लावणे स्वाभाविक होते. मात्र, या अर्थसंकल्पात करांमध्ये वाढ करण्यात आलेली नसून, महागाई दरदेखील पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे’ असे त्यांनी नमूद केले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: