Mira Road: २० रुपयांच्या इडलीसाठी ग्राहकांनी केली विक्रेत्याची हत्या
मीरा रोड: फक्त २० रुपयांच्या इडलीवरून विक्रेत्याला जीव गमवावा लागला आहे. मुंबईपासून जवळच असलेल्या येथे ही धक्कादायक घटना घडली. इडलीच्या किंमतीवरून ग्राहकांशी वाद झाला होता. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. इडलीच्या किंमतीवरून विक्रेत्याचा दोन ग्राहकांशी वाद झाला. सुरुवातीला त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर धक्काबुक्की झाली. त्यांनी विक्रेत्याला धक्का देऊन जमिनीवर पाडले. यात जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र अमृतलाल यादव असे इडली विक्रेत्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साधारण दहा वाजताच्या सुमारास तो इडली विकत होता. त्याच दरम्यान एका ग्राहकाशी २० रुपयांच्या इडलीवरून वाद झाला. काही वेळाने धक्काबुक्की सुरू झाली. दोन ग्राहकांनी इडली विक्रेताा वीरेंद्रला जोराने ढकलले. त्यामुळे तो जमिनीवर पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हे पाऊन दोन्ही ग्राहक पसार झाले. जखमी वीरेंद्रला जवळच्या रुग्णालयात नेले. तपासले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला सोडून दिले. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: