coronavirus updates: चिंतेत भर; दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवे रुग्ण अधिक
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून संसर्गाबाबत आज राज्यातील जनतेला काहीसा दिलासा मिळत असताना आज गेल्या २४ तासांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने चिंतेत काहीशी भर पडली आहे. आज दिवसभरात राज्यात १ हजार ६२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी दिवसभरात राज्यात एकूण २ हजार ६७३ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. म्हणजेच नवे रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण खाली घसरले आहे. तसेच आज राज्यात एकूण ३० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २५ इतकी होती. (maharashtra registered 2,673 new cases in a day) आज बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ५५ हजार ५४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६७ टक्के इतके झाले आहे. तसेच राज्याचा मृत्यूदर २.५१ इतका आहे. याबरोबरत आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४९,७७,६८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,४४,०७१ (१३.६५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात १,७२,३११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच १,९७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यातील अॅक्टीव्ह रुग्णसंख्या दरम्यान, राज्यात आजच्या घडीला ३५ हजार ९४८ इतके अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. काल हीच संख्या ३४ हजार ९३४ इतकी होती. याचाच अर्थ राज्यातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या जवळपास १ हजार ०१४ ने कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना बाधित नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसत होते. मात्र आज रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणापेक्षा नवे रुग्णांची संख्या अधिक असल्याने काहीशी चिंता वाढली आहे. राज्यात आज २ हजार ६७३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या २० लाख ४४ हजार ०७१ इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५१ हजार ३१० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर इतर कारणांमुळे एकूण १ हजार २६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ५ हजार ४८३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर, ठाण्यात ही संख्या ६ हजार ६११, पुण्यात सर्वाधिक ५ हजार ८७८ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्ण गडचिरोलीत आहे. तेथे अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ६१ इतकी आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: