BMCचा अर्थसंकल्प सादर; 'या' आहेत मुंबईकरांसाठी मोठ्या घोषणा

February 03, 2021 0 Comments

मुंबईः मुंबई महापालिकेचा २०२१- २०२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादर केला. यंदा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३९, ३८ ,८३ कोटी रुपयांचा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात यंदा १६.७४ टक्के वाढ झाली आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. महापालिकेनं यंदा घरांच्या मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्ष करोना संकटांशी दोन हात करण्यात गेलं त्यामुळं गतवर्षीच्या तुलनेत महसूल उत्पन्नात ६३६. ७३ कोटींनी घट झाली आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे २०२१-२०२२ या आर्थिक वर्षांसाठीचा अर्थसंकल्प सादर केला. ३९, ३८ ,८३ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. गतवर्षी ३३, ४३४. ५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. दरम्यान, राज्य सरकारकडून पालिकेला ५२७४ कोटी १६ लाख रु. थकबाकी येणे बाकी असून त्यात शिक्षण खात्याकडून ३,६२८ कोटी ८३ लाख रुपयांचा समावेश आहे. घरांना मालमत्ता कर नाही पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता घरातील सर्वसाधारण करातून सूट देण्यात आलेली आहे. संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्यात आलेला नाही. त्यातील केवळ सर्वसाधारण कर माफ करण्यात आल्याचे पुन्हा एकदा जाहीर करण्यात आले आहे. वाचाः आरोग्य बजेटमध्ये वाढ वर्षाच्या सुरुवातीला करोनाचं संकट येऊन उभं राहिलं. या संकटाचा सामना करताना पालिकेला आरोग्य सुविधांवर सर्वाधिक खर्च करावा लागला होता. त्यामुळं यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवा- सुविधांसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक वाढ करण्यात आली आहे. आरोग्य विभागासाठी ४ हजार ७६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५०० कोटींची वाढ करण्यात आली आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रमुख रुग्णालयांमधील यंत्रसामुग्री करण्यासाठी ९६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर, निधन झालेल्या कोविड योद्धांच्या कुटुंबीयांना ५० लाख सानुग्रह मदत देणार. वाचाः अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये महत्त्वकांशी कोस्टल रोड प्रकल्पासाठी २ हजार कोटींची तरतूद गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी १३०० कोटी बेस्ट उपक्रमासाठी ७५० कोटी रुपयांची तरतूद विविध सेवा शुल्क आणि छाननी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. रखडलेल्या रुग्णालयाची दुरुस्ती करणार नव्या रुग्णालयाची उभारणी नर्सिंग स्कूलचे रुपांतर नर्सिंग कॉलेजमध्ये करणार एमआरआयडीसीएल मार्फत १६७५ कोटी इतका अंदाजित खर्च असलेली १२ पुलांची कामे हाती


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: