महाराष्ट्रातून कर्नाटकात जाताय?; थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग (thermal screening) करण्याचा निर्णय सरकारने () घेतला आहे. महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कोगनोळी टोल नाक्यावर यंत्रणा उभारण्यात आली आहे. ( of people coming to karnataka from maharashtra) गेल्यावर्षी महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर कोगनोळी नाक्यापलिकडे कर्नाटकात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. कागलच्या पुढे कोणालाही सोडण्यात येत नव्हते. इतर राज्यात राहणाऱ्या मुळच्या कर्नाटकातील व्यक्तीचे निधन झाले तरीही त्याचा मृतदेहदेखील या राज्यात घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती. यामुळे अनेक मृतदेहावर कोल्हापूर जिल्ह्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुन्हा करोनाचा संसर्ग सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकने कठोर निर्णय घेतले आहेत. कर्नाटकात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. यासाठी कोगनोळी टोल नाक्यावर चेक पोस्ट यंत्रणा उभारण्यात आली आहे. प्रत्येकाची तपासणी करूनच पुढे सोडण्यात येत असल्याने येथे वाहनांच्या रांगा दिसत आहेत. क्लिक करा आणि वाचा- कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सध्या करोनाचा संसर्ग फारसा नसला तरी राज्यातील इतर जिल्ह्यात तो वाढल्याने दक्षता म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक निर्बंध घातले आहेत. सभा, संमेलने, मोर्चा यावर बंदी घालण्यात आली आहे. पन्नास व्यक्तीपेक्षा अधिक लोकांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे लग्नासह इतर अनेक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: