ठाकरे सरकारमधील 'या' मंत्र्याचा फोन टॅप? त्या ट्वीटनं खळबळ
मुंबईः राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री यांच्या ट्वीटनं खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा फोन टॅप करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी फोन टॅप होत असल्याचा दावा केला होता. विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचे फोन व विशेषत: व्हॉट्सअॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा जितेंद्र आव्हाड यांनी फोन टॅप होत असल्याचा दावा केला आहे. तसं ट्वीटही त्यांनी केलं आहे. वाचाः जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री दीड वाजता एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये म्हटलंय की, माझा फोन टॅप होत असल्याचा संशय येत आहे. विशेष म्हणजे काही एजन्सीकडून व्हॉट्सअॅप मेसेजही टॅप करण्यात येत आहेत, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाला होता. संजय राऊत यांनीही भाजपचे नाव घेत थेट आरोप केला होता. तुमचे फोन टॅप होत आहेत अशी माहिती मला भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्यानं दिली होती, असं राऊत म्हणाले होते. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: