धक्कादायक! अधिकृत सेंटरमधूनच दिले जात होते बोगस आधारकार्ड

February 05, 2021 0 Comments

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणून अनेक ओळखपत्रांपैकी एक असलेले अधिकृत सेंटरमधूनच बोगस दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी दोघांना अटक केली असून, नेपाळच्या नागरिकासह अनेकांना या दोघांनी बोगस कागदपत्रांवर आधारकार्ड बनवून दिल्याचे समोर आले आहे. पश्चिमेकडील कॅनरा बँकेत आधारकार्ड नोंदणीची सेवा पुरविणाऱ्या कंपनीने त्यांचे अधिकृत सेंटर सुरू केले आहे. बँकेचे अधिकारी केवायसी अपडेटसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून आधारकार्डसाठी या सेंटरवर पाठवतात. त्यानंतर या सेंटरमधील ऑपरेटर कागदपत्रे स्कॅन करून, ग्राहकाचे फिंगरप्रिंट, डोळे स्कॅन करून फोटो व इतर कागदपत्र अपलोड करतात. यासाठी १०० रुपये शुल्क घेतले जात असून त्याची पावती दिली जाते आणि आधारकार्ड घरच्या पत्त्यावर येते. ही नोंदणीची प्रक्रिया असताना येथील ऑपरेटर परस्पर बोगस कागदपत्रांवर आधारकार्ड तयार करून देत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ११ च्या पथकाला मिळाली. प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रईस शेख. सहायक निरीक्षक भरत घोणे, विशाल पाटील यांच्यासह रवींद्र भांबीड, दीपक कांबळे, अजय कदम, रिया अणेराव याच्या पथकाने या सेंटरवर छापा टाकला. पोलिसांनी विनोद चव्हाण आणि उमेश चौधरी या दोघांना अटक केली. कार्डमागे चार ते पाच हजार कुणाची कागदपत्रे कमी असल्यास किंवा कुटुंबातील लहान मुलाचे आधारकार्ड काढायचे असल्यास परिचयातील व्यक्तीची कागदपत्र देण्याची तरतूद आहे. या सेंटरमध्ये परिचयातील व्यक्ती म्हणून कुणाचीही कागदपत्रे जोडून कुणालाही आधारकार्ड मिळवून दिले जात होते. एका आधारकार्डमागे हे दोघे चार ते पाच हजार रुपये घेत होते. अनेकांना तर पैसे देऊनही आधारकार्ड मिळाली नसल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: