'विरोधक काहीही करो आमची चाल हत्तीसारखी शांततेत'
म. टा. प्रतिनिधी, जळगाव: आमच्यावर विरोधक कितीही चाल करत असतील तरी आमची चाल मात्र हत्तीसारखी अगदी शांततेत आहे. ती शांततेत असली तरी गजकेसरिया योगाची चाल आहे. आमची चाल ही पूर्ण उद्दिष्टापर्यंत पोहोचणारी असल्याचा ,टोला शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना लगावला. लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने जळगावात शिवजयंतीचे औचित्य साधून बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना बुध्दीबळाच्या खेळाचा संदर्भ देत विरोधकांवर टीका कली. वाचाः मंत्री पाटील पुढे म्हणाले की, बुद्धिबळ खेळाकडे पाहिले की राजकारणाची आठवण येते. राजकारणातही एकमेकांचे पत्ते कापले जातात. अडीच घर चालणारी चाल आहे. तिरपी चाल आहे, हत्तीची सरळ चाल आहे. वजीर चौफेर चाल चालतो. तशाच पद्धतीने राजकारणात चालत असते. वाचाः यावेळी ना. पाटील म्हणाले की, राजकारणात बुद्धिबळ सारखाच खेळ खेळला जातो. आपला प्यादा कसा सरकवायचा, हे बुद्धिबळात बघितले जाते. पण आजची राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर इथे फक्त वजीर चाल चालतोय, असे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेते यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. वाचाः गुलाबराव पाटील यांनी आमच्यावर विरोधक कितीही चाल करत असतील तरी आमची चाल मात्र हत्तीसारखी अगदी शांततेत आहे. ती शांततेत असली तरी गजकेसरिया योगाची चाल असल्याचे, सांगत गुलाबरावांनी विरोधकांना चिमटाही काढला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: