करोनामुक्त महिलेला झाला 'हा' दुर्मिळ जंतुसंसर्ग
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनातून बरे झाल्यानंतर '' हा दुर्मिळ झालेल्या एका महिलेचे प्राण वाचवण्यात परळ येथील रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. या जंतुसंसर्गामुळे हाडांची झीज आणि स्नायू कमकुवत होणे असे दुष्परिणाम होतात. तसेच रुग्णाच्या डोळ्यांवरही घातक परिणाम होण्याची शक्यता असते. वाचा: जिल्ह्यात राहणाऱ्या सोना यांची करोनामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाली होती. त्यातच रक्तातील साखरेच्या कमतरतेमुळे त्यांना 'म्यूकोर्मिकोसिस' हा दुर्मिळ आजार झाला होता. हा संसर्ग नाकात आणि डोक्यापर्यंत गेला होता. स्थानिक रुग्णालयात या महिलेवर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तरीही प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. त्रास वाढू लागल्याने कुटुंबीयांनी तिला मुंबईतील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. या महिलेवर अँटी-फंगल उपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रियेद्वारे संसर्ग झालेला डोक्यावरील टाळूचा अर्धा भाग काढून टाकण्यात आला. वेळीच उपचार झाल्याने या महिलेचे डोळे वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. म्यूकोर्मिकोसिस म्हणजे काय ? म्यूकोर्मिकोसिस हा जंतुसंसर्गाचा प्रकार असून करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या संसर्गाचा धोका रुग्णांमध्ये वाढत असून तो जिवावरही बेतू शकतो. त्यामुळे या प्रकारच्या संसर्गासाठी तातडीने वैद्यकीय उपचार होणे गरजेचे आहे. हा बुरशीजन्य आजार असून मधुमेह रुग्ण आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना याचा धोका अधिक असल्याचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. मिलिंद नवलखे यांनी सांगितले. वीस वर्षांपूर्वी या संसर्गाने पीडित असे एक ते दोन रुग्ण येत असत. मात्र त्यानंतरच्या काळात २५ ते ३० रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. करोनामुक्त झालेले पन्नासहून अधिक रुग्ण मागील तीन महिन्यांत रोगप्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे बुरशीजन्य आजाराचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी आल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. या संसर्गामध्ये काय होते? हा जंतुसंसर्ग झाल्यानंतर रुग्णाला सर्दी होते. नाकाला सूज येऊन वेदना जाणवू लागतात. वेळीच उपचार न झाल्यास डोळ्यावर परिणाम होऊन दृष्टी जाण्याचीही भीती असते. अनेकांना या आजाराबद्दल माहिती नसल्याने रुग्ण उशिरा डॉक्टरांकडे जातात. वैद्यकीय तपासणी केली असता रुग्णाला म्यूकोर्मिकोसिस असल्याचे निदान होते. डोळ्यांवर आणि मेंदूवर याचा परिणाम होतो. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी शरीरातील ज्या भागात संसर्ग झाला आहे तो भाग काढून टाकावा लागतो. ग्लोबल रुग्णालयातील संसर्गजन्य विभागाचे प्रमुख डॉ. वसंत नागवेकर म्हणाले की, मधुमेहावर नियंत्रण ठेवल्यास कुठल्याही संसर्गाचा धोका टाळता येऊ शकतो. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: