दहावीतल्या मुलाला मिळाले हृदय; नव्या वर्षातील पहिली शस्त्रक्रिया
म. टा. प्रतिनिधी, मुंबई एका पंधरा वर्षीय मुलावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडून त्याला जीवनदान मिळाले. २०२१मधील मुंबईतील ही पहिली अडीच तासांमध्ये पूर्ण झाली. एका ४५ वर्षीय रुग्णाची पत्नी व आईने त्याचे करण्यास संमती दिल्यानंतर ही शस्त्रक्रिया होऊ शकली. हृदयदाता कॅटास्ट्रोफिक पोस्टेरिअर सर्क्युलेशन इनपाफर्क्टने (इस्केमिक स्ट्रोक) पीडित होता. या ४५ वर्षीय व्यक्तीचा मेंदू मृतावस्थेत असल्याचे कळल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून अवयवदानासाठी संमती मिळवली. तर हृदय मिळालेल्या या विद्यार्थ्याच्या शरीरातील हृदय निकामी होण्याच्या स्थितीमध्ये होते. त्यामुळे त्याला वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाच्या कुटुंबाने घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे या रूग्णाला जीवनदान मिळाल्याचे पेडिएट्रिक कार्डिअॅक सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार धनंजय मालणकर यांनी सांगितले. वाचा: दहावीला असलेला हा विद्यार्थी डायलेटेड कार्डियोमायोपॅथीने पीडित होता. या आजारामध्ये हळूहळू हृदय निकामी होत जाण्याची प्रक्रिया वाढत गेली. त्याच्या एका भावाचा याच आजारामुळे मृत्यू झाला होता. मागील एक वर्षापासून कार्डिअॅक प्रत्यारोपणासाठी तो प्रतीक्षा यादीमध्ये होता. करोना संसर्गाच्या काळात त्याला योग्य दाता मिळणे अवघड झाले होते. रुग्णालयाच्या पेडिएट्रिक कार्डियोलॉजीच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. स्वाती गरेकर यांनी सांगितले, की ' हा गंभीर आजार आहे. या विद्यार्थ्यांचे हृदय अत्यंत कमकुवत व मोठे होते. अनेक अडथळ्यांवर मात करून हे प्रत्यारोपण यशस्वी करण्यात आले. यापुढील काळात हा अवयव त्या विद्यार्थ्याच्या शरीराने नाकारू नये यासाठी योग्य रितीने काळजी घेत औषधोपचार घेत राहणे आवश्यक आहे.' वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: