छगन भुजबळ यांना करोना, काल लावली होती विवाह सोहळ्याला हजेरी

February 22, 2021 0 Comments

नाशिक: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी करोनाची चाचणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे, भुजबळ यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष हेही तिथं उपस्थित होते. ( Tests Corona Positive) 'माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली करोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करा,' असं छगन भुजबळ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. भुजबळ यांनी रविवारी साहित्य संमेलन आणि करोना आढावा बैठकीला उपस्थिती लावली होती. तसंच, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्यालाही ते उपस्थित होते. त्यांच्यासोबत शरद पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक नेते व पदाधिकारी होते. त्यामुळं चिंता वाढली आहे. राज्यातील लोकप्रतिनिधींना करोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. ठाकरे सरकारमधील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. त्यातील काहींनी करोनावर मात करून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. तर, काही जण उपचार घेत आहेत. आता भुजबळ यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं सरकारची चिंता वाढली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: