'आता हे देशभक्त इलेक्ट्रीक कार चालवतात का?'
मुंबईः देशात इंधनदरवाढीच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसनं आता या मुद्द्यावरुन बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते यांनी एक ट्विट करत बॉलिवूड कलाकारांना खोचक सवाल केला आहे. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांनी ट्विट करत पेट्रोल दरवाढीवर भाष्य केलं होतं. भाई जगताप यांनी २०१२ मध्ये या कलाकारांनी केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचाः भाई जगताप यांनी कलाकारांनी केलेल्या ट्विटचा फोटो शेअर करत 'हे देशभक्त आता ईलेक्ट्रीकल्स कार चालवतात का?', असा सवाल केला आहे. काय आहेत ट्विट अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांनी केलेले ट्विट भाई जगताप यांनी शेअर केले आहेत. यात अक्षय कुमारनं आता पुन्हा सायकल वापरावी लागणार, असा आशय असलेलं एक ट्विट केलं होतं. तर, अमिताभ बच्चन यांनी गाडी खरेदी करण्यासाठी कॅश लागणार तर, पेट्रोलसाठी लोन घेण्याची गरज आहे, असं ट्विट केलं होतं. अनुपम खेर यांनीही एक जोक शेअर करत पेट्रोल-डिझेल दरवाढीवर टीका केली होती. हे सर्व ट्विट सन २०१२चे आहेत. वाचाः दरम्यान, मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९३. ४९ रुपये इतके आहे. तर, नागपूरमध्ये प्रतिलिटर ८४. ५४ रुपये, नाशिकमध्ये ८२. ०४ रुपये आहे. राज्यातील इतर शहरातही अशीच प्ररिस्थिती आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीवरुन महाविकास आघाडीनं आक्रमक भूमिका घेतली आहे. काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मुंबई दौऱ्यावर असताना काँग्रेसनं आंदोलन केलं होतं. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध केला होता.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: