'महिला वर्षभर लिव्ह-इनमध्ये राहतात, नंतर बलात्कार झाल्याचे सांगतात'
भिवंडीः महिला पुरुषासोबत वर्षभर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला, असं धक्कादायक विधान समाजवादी पक्षाचे नेते यांनी केलं आहे. तसंच, अशा गोष्टींची तक्रार करताच पुरुषाचं नाव मीडियात येता कामा नव्हे, असंही ते म्हणाले आहेत. 'देशात कायदा चुकीचा आहे. कायद्यानुसार कोणतीही स्त्री लग्नाशिवाय कोणत्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशनमध्ये. लिव्ह इन रिलेशन म्हणजे काय तर, महिला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही आणि वर्षभरानंतर सांगतात माझा बलात्कार झाला,' अशी टिप्पणी अबू आझमी यांनी केली आहे. लिव्ह इन रिलेशनबरोबर पाश्चिमात्य संस्कृतींवरही त्यांनी सडकून टीका केली आहे. वाचाः 'इस्लामी कायद्यानुसार एखाद्या महिलेचं जर लग्न झालं असेल तर ती महिला परपुरषासोबत संबंध ठेवू शकत नाही. कोणत्याही महिलेनं परपुरषासोबत राहु नये, हे इस्लामी कायद्यात सांगितलं आहे. खरं तर प्रत्येत धर्मात हेच सांगितलं आहे. पण, जसजसा काळ पुढे सरकतोय तसं भारतात पाश्चिमात्य संस्कृतीचे वारे वाहू लागले आहे. याच गैरफायदा घेऊन बदनामी करताना दिसत आहेत. एखाद्या महिलेनं तक्रार केली, तर पुरुष जिवंतपणी मेलाच मात्र, सत्य काय आहे हे चौकशी झाल्यानंतरच समोर येतं,' असंही आझमी यांनी म्हटलं आहे. वाचाः महिलांनी डोक्यावर पदर घेऊन वावरलं पाहिजे, असंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे. त्यांनी एक उदाहरण देत भारतीय संस्कृतीचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 'मी एकदा यूपीला गेलो होतो. तिथं एक महिला भरदुपारी डोक्यावर शेण घेऊन जात होती. तरीदेखील तिनं डोक्यावर पूर्ण पदर घेतला होता, ही आपल्या देशाची संस्कृती आहे. डोक्यावर पदर न घेता वावरलात, पुरुषांमध्ये फिरलात, लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिलात तर अशा घटना होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळं अशा गोष्टींवर बंधने असायला हवी,' असं मत आझमी यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय, 'अशा गोष्टींची तक्रार झाल्यानंतर पुरुषांचं नाव लगेचच मिडीयात येता कामा नये, त्या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाल्यानंतरच नाव घेतलं पाहिजे,' अशी मागणीही त्यांनी केली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: