बजेटवर बोलताना फडणवीसांनी पकडला नेमका 'तो' मुद्दा

February 01, 2021 0 Comments

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा आत्मविश्वासानं भरलेला आत्मनिर्भर भारताचा अर्थसंकल्प आहे. नव्या कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारच्या विरोधात ओरडणाऱ्या विरोधकांची तोंडे बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे,' अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी दिली आहे. ( Reaction on ) वाचा: करोनाची महासाथ, त्यानंतरचा लॉकडाऊन आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प मांडला. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे सावट या अर्थसंकल्पावर होते. या आंदोलनाची दखलही अर्थसंकल्पातून घेतलेली दिसत आहे. शेती क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर बोलताना कृषी क्षेत्रातील तरतुदींवर भर देत विरोधकांना टोला हाणला. वाचा: 'लॉकडाऊनमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर असलेली आव्हानं, वित्तीय तूट या सगळ्याचा कुठलाही परिणाम होऊ न देता अर्थव्यवस्थेला अधिक चालना कशी मिळेल याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. 'आरोग्य, आर्थिक सुधारणा, मनुष्यबळ विकास, नाविन्यपूर्ण संशोधन, पायाभूत सोयीसुविधा, मॅक्सिमम गव्हर्नन्स ही या अर्थसंकल्पाची सहा प्रमुख सूत्रे आहेत, असं फडणवीस म्हणाले. वाचा: 'केंद्रातील सरकार कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करणार असल्याची आवई विरोधकांनी उठवली होती. त्यांची तोंड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे. बाजार समित्या मजबूत करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. किमान हमी भावाबद्दल ओरडणाऱ्या विरोधकांना सीतारामन यांनी आरसा दाखवला आहे. मागील सरकारपेक्षा दुप्पट हमीभाव मोदी सरकारनं दिला आहे,' असा दावाही फडणवीस यांनी केला. 'देशाला महासत्तेकडे नेणारा अर्थसंकल्प' भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी देखील अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. 'देशाला महासत्तेकडं घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत करून देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारा, समतोल अर्थसंकल्प आहे. आरोग्य क्षेत्रासाठी प्रथमच इतकी मोठी तरतूद करण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी भरीव निधी दिला गेला आहे, असं नारायण राणे म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: